बाप रे! रुग्णाच्या पोटात २९ चमचे, १९ टूथब्रश अन दोन पेन!

उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यातील घटना 

बाप रे! रुग्णाच्या पोटात २९ चमचे, १९ टूथब्रश अन दोन पेन!

लोकांच्या पोटात केसांचे पुंजके आढळल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण कधी एखाद्याच्या पोटात एक-दोन नव्हे तर २९ स्टीलचे चमचे, १९ टूथब्रश आणि २ पेन सापडल्याचे तुम्ही ऐकले आहे का? नाही ना? पण असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातून समोर आला आहे. पोटाची तक्रार करत आलेल्या रुग्णाच्या पोटाचा एक्सरे काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

एक्स-रे मध्ये त्या तरुणाच्या पोटात विविध विकृती आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली. ऑपरेशननंतर डॉक्टरांनी त्या तरुणाच्या पोटातून ४९ असामान्य आणि आश्चर्यकारक वस्तू काढल्या, ज्यामुळे डॉक्टरही थक्क झाले. 

बुलंदरशहर येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय रुग्ण सचिनला ड्रग्जचं व्यसन होतं. सचिनच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे त्रस्त होऊन त्याच्या कुटुंबाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. तथापि, अन्नाचा अभाव आणि ताण यामुळे सचिन रागावू लागला आणि हळूहळू स्टीलचे चमचे, टूथब्रश आणि पेन गिळू लागला. ही सवय अनेक दिवस चालू राहिल्यानंतर त्याला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हे ही वाचा : 

काँग्रेसला पूर्ण गाळात घालणारच!

कबरी खोदून मृतदेहाचे कापत होता केस !

त्रिनेत्री बगलामुखी

बाईने कणा दाखवला; युरोपची मर्दानी मेलोनी !

डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात धातूच्या वस्तू आढळून आल्याने त्यांना धक्का बसला. ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने एकूण ४९ वस्तू काढल्या, ज्यात २९ स्टीलचे चमचे, १९ टूथब्रश आणि दोन पेन यांचा समावेश होता. डॉ. श्याम कुमार यांनी स्पष्ट केले की मानसिक समस्या असलेल्या लोकांमध्ये असे प्रकार सामान्यतः दिसून येतात. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर सचिनची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Exit mobile version