हिंदी-मराठी भाषावाद : अभिनेता जैन दुर्रानी काय म्हणाले ?

हिंदी-मराठी भाषावाद : अभिनेता जैन दुर्रानी काय म्हणाले ?

अभिनेता जैन दुर्रानी यांचा चित्रपट ‘आंखों की गुस्ताखियां’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी आणि मराठी भाषेच्या वादावर जैन दुर्रानी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी प्रादेशिक भाषा आणि संस्कृतींना योग्य तो सन्मान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

जैन म्हणाले की, आपण जिथे राहतो त्या भागाची भाषा आणि संस्कृती स्वीकारली पाहिजे, पण त्याचवेळी आपल्या मुळांशी नातेही टिकवले पाहिजे. या मुद्द्यावर त्यांनी सांस्कृतिक ऐक्याचा आग्रह धरत सांगितले की, “आपली भाषिक विविधता ही फूट निर्माण करणारी नसून ऐक्याचा पूल बनायला हवी. जैन दुर्रानी म्हणाले, “भारत हा अनेक भाषा आणि संस्कृतींचा देश आहे. माझ्या मते, आपण ज्या भागात राहतो त्या भागातील भाषेला आपण सन्मान दिला पाहिजे. आणि हा सन्मान केवळ वरवरचा किंवा दिखाव्यासाठी नसावा, तर त्या संस्कृतीला आपलंसं करण्यासाठी आणि आपली संस्कृती इतरांसोबत वाटून घेण्यासाठी असावा.”

हेही वाचा..

‘सिंदूर पुलाचे’ झाले उद्घाटन

गृहमंत्री अमित शहा निवृत्तीनंतर करणार काय? म्हणाले…

केजरीवालांना नोबेलची इच्छा, भाजपा म्हणाली- भ्रष्टाचारासाठी कसला नोबेल? 

पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान मोदी भारतात परतले! 

सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषेच्या संदर्भात तणावाचं वातावरण आहे. मराठी न बोलणाऱ्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंसक कारवाया केल्याचा आरोप आहे. जैन दुर्रानी यांचा चित्रपट ‘आंखों की गुस्ताखियां’ हा प्रसिद्ध लेखक रस्किन बॉन्ड यांच्या ‘द आयज हॅव इट’ या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात त्यांच्या सोबत विक्रांत मॅसी आणि शनाया कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.

हा चित्रपट झी स्टुडिओज आणि मिनी फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झाला असून, मानसी बागला आणि वरुण बागला हे याचे निर्माते आहेत. विक्रांत मॅसी यांचा मिनी फिल्म्ससोबतचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. यापूर्वी त्यांनी ‘फॉरेन्सिक’ या चित्रपटाच्या रिमेकमध्येही त्यांच्यासोबत काम केले होते. ‘आंखों की गुस्ताखियां’ हा चित्रपट ११ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version