‘भोंगे मुक्त महाराष्ट्र’ मोहीम राबवत बेकायदेशीर भोंग्याविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या आवाज उठवत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी भेट देत बेकायदेशीर भोंग्याविरोधात त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेत मस्जिद-मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे पोलीस प्रशासनाकडून खाली उतरवण्यात आले आहेत, येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, अमरावती जिल्ह्यात देखील अनेक मशिदी आहेत, ज्यांच्यावर विनापरवाना भोंगे लावण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन परिसरातील ३९ मशिदीवर भोंगे आहेत. आसेगाव पूर्णा येथे १३ मशिदीवर भोंगे आहेत. यासह लोणी पोलिस स्टेशन परिसरात ७ मशिदीवर भोंगे आहेत. मात्र, एकाही मशिदीने यासाठी पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचे सोमय्या यांनी ट्वीटकरत सांगितले. संबंधित पोलीस ठाण्याकडे मशिदी आणि त्यांवरील भोंग्याबाबत माहिती मागविली होती. त्यानंतर पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती सोमय्या यांनी समोर मांडली. दरम्यान, या बेकायदेशीर भोंग्याविरोधात पोलिसांच्या कारवाईवर आता सर्वांचे लक्ष आहे.
हे ही वाचा :
मूलनिवासी दिवसाच्या निमित्ताने विभाजनाचा डाव
मला नाही अब्रू, मी कशाला घाबरु…
कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार!
भारतासोबत व्यापार चर्चेला डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार!
मुंबई हायकोर्टाने मशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत निर्णय दिल्यानंतर सोमय्या यांनी ‘भोंगे मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेला जोर लावला. मशिदींच्या भोंग्याविरोधात आवाजाची तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले होते. आवाजा विरोधात तक्रार आल्यास पहिल्यांदा समज द्या, नंतर दंड आकारा, पुन्हा आदेशाचे उल्लंघन केल्यास भोंगा जप्त करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिल्या होत्या. ध्वनी प्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास ताकीद देणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते.
मशिदींवरील अनधिकृत भोंगे
अमरावती जिल्ह्यातील
खोलापूर पोलीस स्टेशन परिसरातील 39 मशिदीवर भोंगे आहे, एकाचीही परवानगी घेतली नाही
आसेगाव पूर्णा 13 मशिदीवर भोंगे आहे, एकही मशिदीने परवानगी घेतली नाही
लोणी पोलिस स्टेशन परिसरात 7 मशिदीवर भोंगे आहे, एकही मशिदीने परवानगी घेतली नाही… pic.twitter.com/n2gcHdtoDl
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 8, 2025
