‘I Love Mohammed’ या घोषणेवरून देशभरात सुरू असलेल्या वादात आता बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना अशा प्रकारच्या घोषणांवर कोणतीही हरकत नाही, परंतु “जेव्हा मी ‘I Love Mahadev’ म्हणतो, तेव्हा तुम्हाला त्रास का होतो?” असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
एएनआयशी संवाद साधताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “आम्ही ‘I Love Mohammed’ या घोषणेला विरोध केलेला नाही. आम्ही त्याला समर्थन दिले. पण तुम्ही जर ‘I Love Mahadev’ या घोषणेवर आक्षेप घेत असाल, तर ते योग्य नाही.”
त्यांनी पुढे अत्यंत ठाम शब्दांत म्हटले की, “‘सर तन से जुदा’ सारखी विधाने देऊ नका. हे देशाच्या कायद्याविरुद्ध आहे, संविधानाविरुद्ध आहे.” शास्त्री यांनी हे देखील स्पष्ट केले की, त्यांनी आजवर हिंसाचाराला कधीही प्रोत्साहन दिलेले नाही.
ते म्हणाले, “आम्ही तलवारीच्या लढाईवर विश्वास ठेवत नाही. आम्ही केवळ विचारांच्या लढाईवर विश्वास ठेवतो. आजवर आमचे सर्व वक्तव्य तपासून पाहा – कुठेही द्वेष किंवा हिंसाचाराचे समर्थन नाही.” धीरेंद्र शास्त्री यांच्या या विधानामुळे सध्या सुरू असलेल्या धार्मिक आणि सामाजिक चर्चांना नवीन वळण मिळाले आहे. त्यांनी दिलेले विधान शांतता, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादेतील आहे, असे अनेकांचे मत आहे.
हे ही वाचा :
“फक्त हिंदूंनाच उपदेश का? इतर वेळीही फटाके फोडले जातात”
फटाक्यांमुळे प्रदूषण होते या विषयावरून सुरू झालेल्या चर्चांवर बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “कोणीतरी विधान केलं की फटाके फोडल्यामुळे प्रदूषण होते. आम्ही त्यावर सहमत आहोत. पण फटाके ख्रिसमसला, १ जानेवारीला किंवा देश क्रिकेट सामना जिंकल्यावरही फोडले जातात. त्यातूनही प्रदूषण होते.”
शास्त्री पुढे म्हणाले, “पण उपदेश नेहमी हिंदू सणांवरच का दिला जातो? जर तुम्ही फक्त हिंदूंनाच लक्ष्य करत असाल, तर आम्हाला हे जाणीवपूर्वक केलेले वाटते. यामुळे आमच्यात नाराजी आणि असंतोष निर्माण होतो.”