“माफी न मागितल्यास जनता काँग्रेसमुक्त भारत करेल”

भाजप खासदार जगदंबिका पाल यांचा  इशारा

“माफी न मागितल्यास जनता काँग्रेसमुक्त भारत करेल”

राहुल गांधी यांच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात असून माफी मागण्याची मागणी केली जात आहे. दरभंगा येथे घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेस कार्यकर्ते व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी राहुल गांधींवर टीका करत कॉंग्रेस पक्षाला इशारा दिला आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार जगदंबिका पाल म्हणाले, “राहुल गांधी यांनी पंतप्रधानांविषयी केलेली अपमानास्पद वक्तव्ये ही देशाच्या जनतेच्या कौलाचा अपमान आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने पराभवाला सामोरे जात आहे आणि आता त्यांनी शिवीगाळीच्या पातळीवर उतरले आहे.”

ते पुढे म्हणाले, “अशा प्रकारची विधानं देशाला लज्जास्पद वाटावीत अशी आहेत. ही राहुल गांधी यांची निराशा आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर ज्याप्रमाणे देशातील जनतेने त्यांना नाकारले आहे, त्याचप्रमाणे येत्या काळात जनता हा भारत काँग्रेसमुक्त करेल.”

हे ही वाचा : 

तामिळनाडूतील भाजप पदाधिकाऱ्याची टोळक्यांनी मारहाण करून हत्या!

भारत आधीच हिंदू राष्ट्र आहे, त्याला कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही: मोहन भागवत

पंतप्रधान मोदींना भेटून उत्साहित झाले जपानी

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीतील आणखी एका सदस्याला अटक

दरम्यान, काँग्रेसने या घटनेपासून स्वतःला दूर ठेवले आहे, नेते रशीद अल्वी यांनी असे म्हटले आहे की पक्षाला अशी भाषा मान्य नाही आणि त्यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तथापि, भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला, पंतप्रधान मोदींविरुद्ध वापरलेली भाषा “पूर्णपणे असह्य” असल्याचे म्हटले आणि राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली.

Exit mobile version