भारताच्या ड्रोन हल्ल्यात लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त!

कराची, रावळपिंडीत ड्रोन हल्ले

भारताच्या ड्रोन हल्ल्यात लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त!

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारत पाकिस्तानवर तुटून पडला आहे. भारताने लाहोर, कराची आणि रावळपिंडी अशा विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करून पाकिस्तानचे मोठे नुकसान केले आहे. भारताने ड्रोन हल्ला करत लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली आहे. यासह रावळपिंडी क्रिकेट स्टेडीअमवर देखील भारताने ड्रोन हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, रावळपिंडीच्या या स्टेडीअम पाकिस्त्नान सुपर लीगचे (पीएसएल) सामने पार पडत आहेत. या हल्ल्यानंतर ‘पीएसएल’ कराची येथे हलवला जाण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

‘ऑपरेशन सिंदूरला’ प्रत्युत्तर म्हणून इस्लामाबादने भारतातील १५ लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी गुरुवारी (८ मे) पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार यंत्रणा आणि एअर डिफेन्स यंत्रणाना टार्गेट केले. यामध्ये पाकची HQ-९ एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. ही एअर डिफेन्स सिस्टीम चीनने पाकिस्तानला दिली होती. भारताने ती आता उद्ध्वस्त केली आहे.

भारतीय लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरुन हल्ला करतील तेव्हा पाकिस्तानची HQ-९ रडार यंत्रणा त्यांना वाचवणार होती. मात्र, भारताने ही रडार यंत्रणा आणि पर्यायाने पाकिस्तानची संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त केल्याने भारतीय लढाऊ विमानांना आता फारसा अडथळा निर्माण होणार नाही. यामुळे आता पाकिस्तानने हल्ला केल्यास भारतीय हवाईदलाची विमाने लाहोरपर्यंत जाऊन कधीही बॉम्बफेक करु शकतील.

हे ही वाचा : 

भारतातील १५ शहरांवर हल्ले करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले! सगळी क्षेपणास्त्रे केली निष्प्रभ

गृहमंत्री अमित शाह यांचा झारखंड दौरा रद्द

पंतप्रधानांनी सचिवांसोबत घेतली उच्चस्तरीय बैठक

नियंत्रण रेषेवर पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; पूंछमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू

HQ-९ हवाई संरक्षण प्रणालीबद्दल बोलायचे झाले तर, ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. हे चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने (CPMIEC) विकसित केले आहे. पाकिस्तानने २०२१ मध्ये ही प्रणाली आपल्या सैन्यात समाविष्ट केली होती. राफेल, सुखोई आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या भारताच्या हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने या प्रणालीचा अवलंब केला होता. तथापि, याची रेंज १२५ ते २०० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. यासह एकाच वेळी १०० लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता असल्याची माहिती आहे.

Exit mobile version