मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची सदाबहार गाणी आणि मनोरंजक किस्से ऐकण्याची संधी चालून आली आहे. जगदीश खेबुडकर यांची गाणी आणि किस्से यांचा मिलाप ‘चित्रगंगा’ कार्यक्रमामध्ये अनुभवता येणार आहे. शुक्रवार, १६ ऑगस्ट रोजी बोरिवलीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्री बुक माय शो वर सध्या सुरू आहे.
मराठी चित्रपट संगीताच्या इतिहासात गाजलेले नाव म्हणजे कवी जगदीश खेबुडकर. प्रतिभावंतांच्या पंक्तीतले कवी जगदीश खेबुडकरांच्या गीतांनी मराठी रसिकांच्या मनावर गेली अनेक वर्षे राज्य केले आणि अजूनही करत आहे. जगदीश खेबुडकर हे अतिशय गोष्टीवेल्हाळ होते. आपल्या प्रत्येक गाण्याच्या पाठीमागे दडलेला किस्सा त्यांच्या नीट स्मरणात असायचा आणि ते तो अतिशय रंगवून सांगायचे. त्यांचे हेच मनोरंजक किस्से आणि त्यांची सदाबहार गाणी ‘चित्रगंगा’ या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहेत.
हे ही वाचा:
उद्या तुम्ही भारत ही तुमचीच संपत्ती आहे म्हणाल! मध्य प्रदेश वक्फ बोर्डाला सुनावले
मांडवीय म्हणाले, विनेशला ऑलिम्पिकसाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले गेले!
नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू !
“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन
रसिक प्रेक्षकांनी आवर्जून पहावा असा ‘चित्रगंगा’ हा कार्यक्रम दिशा थिएटर्स ॲन्ड एंटरटेन्मेंट आणि प्रो एंटरटेन्मेंट यांच्या माध्यमातून बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात शुक्रावर, १६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता पार पडणार आहे. bookmyshow वर या कार्यक्रमाची तिकिटे बुक करता येणार आहेत.
