शिंदेंच्या बॅगांची तपासणी झाली आता ठाकरेंच्या फार्म हाऊसची होऊ द्या!

भाजप आमदार नितेश राणेंची पोस्ट

शिंदेंच्या बॅगांची तपासणी झाली आता ठाकरेंच्या फार्म हाऊसची होऊ द्या!

नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटप करत असल्याचा आरोप उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकताच केला होता.यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुरुवारी (१६ मे) महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराकरिता नाशिकमध्ये पुन्हा दाखल झाले.यावेळी मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच मुख्यमंत्री शिंदेंच्या मागून घेऊन येणाऱ्या बॅगांची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली.मात्र, त्यांच्या बॅगांमधून काहीच सापडले नाही. दरम्यान, अशीच चौकशी उद्धव ठाकरेंच्या कर्जत फार्महाऊसची व्हावी अशी मागणी करणारी पोस्ट भाजपचे नेते नितेश राणे यांनी केली आहे.

नाशिक दौऱ्यावर असताना आज शहरातील निलगिरी हेलिपॅड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर लँड झाल्यावर पोलिसांनी स्वतःहून त्यांच्या दोन्ही बॅगा तपासल्या. या बॅगमध्ये कपडे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू आढळून आल्या.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे नाशिकला आले होते.त्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नऊ बॅगांमध्ये १२ ते १३ कोटी रुपये नाशिकमध्ये घेऊन आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

हे ही वाचा:

स्वाती मालीवाल हल्ल्याच्या आरोपावर केजरीवालांनी प्रश्न टाळला

‘भारत-फ्रान्सचे लष्कर दाखवणार क्षमता, मेघालयात ‘शक्ती’ सराव सुरू’

‘तर ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपींना अटक करू शकत नाही’

सीएए बद्दल खोटी माहिती पसरवून देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न

संजय राऊत यांच्या आरोपावर भाजपचे आमदार नितेश यांनी प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची जशी तपासणी झाली तशीच तपासणी उद्धव ठाकरेंच्या कर्जत येथील फार्महाऊसची देखील होऊदे, अशी मागणी त्यांनी केली आहे.नितेश राणे यांनी ट्विटकरत लिहिले की, जसे मुख्यमंत्री साहेबांच्या BAG तपासण्यात आल्या..तसंच एकदा उद्धव ठाकरेनचा “कर्जत फार्महाउस” पण चेक होऊन दे..तिथे किती BAG जमिनीच्या खाली आहेत..त्यांचा ही हिशोब झाला पाहिजे!! आहे का हिम्मत..फार्महाउस चे दरवाजे उघडा..सब राझ खुल जयेंगे, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version