कंगनाची सुरक्षेसाठी सुप्रिम कोर्टात धाव

कंगनाची सुरक्षेसाठी सुप्रिम कोर्टात धाव

विविध कारणांवरून गेला काही काळ सातत्याने वादात असणारी अभिनेत्री कंगना रनौत हीने मुंबईत शिवसेेनेकडून धोका असल्याने मुंबईतील खटले हिमाचल प्रदेशात हलवण्याची मागणी केली आहे. ती आणि तिची बहिण रंगोली चंदेलने ही याचिका दाखल केली आहे.

हे ही वाचा:

“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न”

कंगना आणि तिच्या बहिणीने मुंबईत शिवसेनेकडून धोका आहे. मुंबईत सुनवणी चालवल्यास शिवसेना नेते कोणत्याही थराला जाऊ शकतात असा दावा या याचिकेत केला आहे. आपले वकिल नीरज शेखर यांच्याद्वारे कंगनाने हे खटले हिमाचल प्रदेशात हलविण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

कंगना रानौतवर तिच्या वादग्रस्त वक्तव्ये आणि ट्वीटमुळे विविध खटले दाखल करण्यात आले आहेत. वकिल अली कासिफ खान, गीतकार जावेद अख्तर आणि मुनव्वर अली सय्यद या तिघांनी मुंबईत विविध कारणास्तव कंगनावर खटले दाखल केले आहेत. मुनव्वर अली सय्यद यांच्या खटल्यात कंगनासोबत तिच्या बहिणीचे देखील नाव आहे.

याशिवाय कृषी कायद्यांवरील वादग्रस्त विधानांमुळे कर्नाटकातही तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली होती. कंगनाने ही एफआयआर रद्द करण्यात यावी अशी याचिका देखील केली होती. मात्र कर्नाटक उच्च न्यायलयाने दिला दिलासा द्यायला नकार दिला.

कंगना सातत्याने अंधेरी कोर्टात अनुपस्थित राहिल्याने जावेद अख्तर यांच्या मानहानीच्या खटल्यात तिला वॉरंट बजावले आहे.

Exit mobile version