बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल तर मुलींची बाजी!

राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के

बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल तर मुलींची बाजी!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (HSC) निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

माहितीनुसार, यंदा राज्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टक्क्यांनी घटला आहे. राज्यात एकूण १४ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राज्यात ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. यंदाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून त्यात ९३.१५ टक्के मुली तर ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात लातूर विभाग सर्वात मागे राहिला आहे. लातूरमध्ये ८४.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हे ही वाचा:

कलिंगड प्रकरण: घरातून गोळा केलेल्या अन्नाच्या ११ नमुन्यांमध्ये विष नाही

जबलपूर दुर्घटना: बोट बुडायला लागल्यानंतर लाईफ-जॅकेटची शोधाधोध केली

जर्मनीतून ५,००० अमेरिकन सैनिकांना माघारी बोलावणार

४ वर्षीय चिमुरडीची अत्याचारानंतर हत्या; ६५ वर्षीय आरोपी अटकेत

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्चमध्ये एकूण १५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. यंदाही मुलींनी बाजी मारत ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २ टक्क्यांची घट झाली आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा ९६.४४ टक्क्यांसह अव्वल ठरली. वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के, तर कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो सर्वात कमी आहे.

बारावीचा विभागनिहाय निकाल

Exit mobile version