लडाख हिंसाचार : काँग्रेस नगरसेवकाने जमाव भडकावल्याचा भाजपाचा आरोप!

४८ जणांना अटक

लडाख हिंसाचार : काँग्रेस नगरसेवकाने जमाव भडकावल्याचा भाजपाचा आरोप!

भाजपाचाने लडाखमधील नुकत्याच घडलेल्या हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले असून, काँग्रेसचे नगरसेवक फुंटसोग स्टॅनझिन त्सेपाग यांचा व्हिडीओ आणि छायाचित्रे सादर करत त्यांच्यावर जमाव भडकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून, ९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हणाले, लडाखमध्ये दंगल करणारा हा माणूस म्हणजे अप्पर लेह वॉर्डचे काँग्रेस नगरसेवक फुंटसोग स्टॅनझिन त्सेपाग. तो जमावाला चिथावणी देताना आणि भाजप कार्यालय आणि हिल कौन्सिलला लक्ष करणाऱ्या हिंसाचारात सहभागी होताना स्पष्टपणे दिसतो. राहुल गांधी अशाच प्रकारच्या अशांततेची कल्पना करत आहेत का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४८ जणांना अटक केली असून, संबंधित प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा भाग म्हणून, कारगिल जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, रॅली वा बेकायदेशीर संमेलनांवर बंदी घालण्यात आली आहे. हिंसाचार पुन्हा भडकू नये म्हणून संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत असले तरी, तणावाचे वातावरण कायम आहे.

लेह जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांसह इंडो-तिबेटी सीमा पोलिस तैनात करण्यात आले. संवेदनशील ठिकाणी लोकांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यांवर कॉन्सर्टिना वायर बसवण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : 

दिल्ली : २५ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित अटकेत!

“भारताला शिक्षा करायची नाही, पण…” अमेरिकेचे ऊर्जा सचिव काय म्हणाले?

‘हिंदूंचं राष्ट्र, येथे कुणाचं दुसऱ्याचं चालणार नाही’

रेल्वेवरून डागता येणार क्षेपणास्त्र; ‘अग्नी-प्राईम’ची यशस्वी चाचणी

दरम्यान, गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांना “त्यांच्या प्रक्षोभक भाषणाद्वारे जमावाला भडकावल्याबद्दल” जबाबदार धरले आहे. लडाखला राज्याचा दर्जा आणि संवैधानिक संरक्षण मिळावे यासाठी १५ दिवसांचे उपोषण करणाऱ्या वांगचुक यांनी काल लेहमध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर लगेचच उपोषण सोडले.

Exit mobile version