२००६ मध्ये झालेल्या मुंबई लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १२ आरोपींना निर्दोष ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की, या स्थगितीचा तुरुंगातून सुटलेल्या आरोपींवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली की, उच्च न्यायालयाने आरोपींना दिलेला निर्दोषत्वाचा निर्णय इतर खटल्यांमध्ये उदाहरण (precedent) म्हणून वापरता येणार नाही.
हा निर्णय महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी देण्यात आला. सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुरुवारी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने त्या १२ आरोपींना नोटीस बजावल्या आणि उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात केलेल्या काही टिप्पणींवरही तात्पुरती स्थगिती दिली.
हेही वाचा..
जन्म प्रमाणपत्र घोटाळा, मराठवाड्यात १२,९६५ जन्म प्रमाणपत्रे रद्द!
पुढील उपराष्ट्रपती जेडीयूचा नाहीतर भाजपाचा असेल!
पंतप्रधान मोदी ब्रिटनमध्ये पोहोचले, लंडनमध्ये जोरदार स्वागत!
उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाव पुढे आलेले रामनाथ ठाकूर कोण आहेत?
महाराष्ट्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “आम्ही आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी करत नाही, पण मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या काही टिप्पण्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत सुरू असलेल्या इतर प्रकरणांतील न्यायप्रक्रियेला बाधा आणू शकतात. या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित टिप्पण्यांवर स्थगिती दिली आणि स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाचा निर्णय इतर खटल्यांमध्ये नजीर ठरू शकणार नाही.
२१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. अनिल किलोर आणि न्या. एस. चांडक यांच्या खंडपीठाने या प्रकरणात १२ आरोपींना निर्दोष घोषित केले. या प्रकरणात एकूण १३ आरोपी होते, त्यापैकी एकाला विशेष न्यायालयाने पूर्वीच निर्दोष ठरवले होते. उच्च न्यायालयाने २१ जुलै रोजी १२ आरोपींना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले, त्यापैकी ५ जण मृत्युदंडाची शिक्षा भोगत होते आणि उर्वरित ७ जण आजीवन कारावासात होते.
जुलै २००६ मध्ये मुंबईतील वेस्टर्न रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये एकूण ७ बॉम्बस्फोट झाले होते. या भीषण हल्ल्यात १८९ नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे ८२० निरपराध लोक गंभीर जखमी झाले होते. या घटनेला “७/११ मुंबई बॉम्बस्फोट” म्हणून ओळखले जाते.
