मसूरीत भूस्खलनामुळे काय होतंय बघा..

मसूरीत भूस्खलनामुळे काय होतंय बघा..

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मसूरीच्या झडीपानी परिसरात सुरू असलेल्या सततच्या भूस्खलनामुळे स्थानिक नागरिकांचं जीवन विस्कळीत झालं आहे. दररोज जमीन २ ते ३ फूट खालच्या बाजूला घसरते आहे, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. या भागात १५ सप्टेंबरच्या रात्रीपासून भूस्खलन सुरू झालं असून अजूनही ते सुरूच आहे. रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत आणि घरांची पायाभरणी सैल होत चालली आहे.

स्थानिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की, १५ सप्टेंबरला एका नेपाळी मजुराचा मलब्याखाली दबून मृत्यू झाला होता, तरीदेखील अद्याप ना भू-वैज्ञानिकांची टीम पोहोचली आहे, ना आपत्ती निवारण दल आलं आहे. स्थानिक महिला सुशीला देवी म्हणाल्या की, “प्रत्येक वेळी पावसात आम्हाला आपले घर सोडून जावं लागतं. आता तर मुलांना शाळेत पाठवतानाही भीती वाटते. प्रशासनाकडून अजिबात मदत मिळत नाही. मुख्यमंत्रीकडून मदत मिळेल असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात कोणताही अधिकारी मदतीला येत नाही.”

हेही वाचा..

पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवरचं टाकले बॉम्ब! ३० सामान्य नागरिक ठार

आरोग्य सेवा झाली स्वस्त

नवरात्रीनिमित्त जम्मू-कश्मीरमध्ये भक्तीमय वातावरण

“भारतावर अतिरिक्त कर लादणे म्हणजे उंदराने हत्तीला मारल्यासारखे” अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ असं का म्हणाले?

स्थानिकांनी प्रशासनासमोर आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, “रात्री हलकासा पाऊस झाला तरी आम्हाला मुलांना घेऊन घराबाहेर जावं लागतं. रात्री वीज नसते, त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात घर कोसळतंय की काय, हे पाहावं लागतं.” त्यांनी सांगितलं की, “अनेकदा अधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली, पण अजूनही काहीच मदत मिळालेली नाही. आमची मुलं उपाशी आहेत.” स्थानिकांनी इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने लवकर ठोस पावलं उचलली नाहीत, तर त्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.

Exit mobile version