उद्योगपती गौतम अदानी कुंभमेळ्यात सहभागी होत भाविकांना प्रसादाचे वाटप! 

सपत्निक भगवान हनुमानाचे घेतले दर्शन

उद्योगपती गौतम अदानी कुंभमेळ्यात सहभागी होत भाविकांना प्रसादाचे वाटप! 

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याला लाखो भाविक दररोज भेट देत आहेत. मंत्री, बडे उद्योगपती देखील महाकुंभ मेळ्यात सहभागी होत आहेत. याच महाकुंभमेळ्यात देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदाणी यांनी आज (२१ जानेवारी) हजेरी लावली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रीती अदानी देखील उपस्थित होत्या. यावेळी गौतम अदानी यांनी प्रयागराजमधील भाविकांना प्रसाद वाटला आणि पूजेमध्येही सहभागी झाले.

महाकुंभ दरम्यान प्रसाद वाटपाची जबाबदारी अदानी ग्रुप आणि इस्कॉने एकत्रितपणे घेतली आहे. ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे. ही सेवा २६ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. महाकुंभमेळा परिसरात दररोज एक लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

देवभूमी द्वारकेतील सात बेटांवरील हडपलेली जमीन केली मुक्त!

अमेरिकेत घुसखोरांना स्थान नाही; ट्रम्प यांच्याकडून मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी

महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अशी दिसणार रश्मिका मंधाना

पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू-उपराष्ट्रपती धनखड महाकुंभात होणार सहभागी, तारीख आली समोर!

त्यानुसार गौतम अदानी यांनी महाकुंभ नगरच्या सेक्टर १८ मधील इस्कॉन टेंटला भेट देत इस्कॉन मंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी भाविकांना आपल्या हाताने प्रसादाचे वाटप केले. यावेळी गौतम अदाणी यांची पत्नीदेखील सोबत होते. या दोघांनीही भाविकांना प्रसादाचे वाटप केले. महाकुंभमेळ्यात गौतम अदाणी यांनी सपत्निक भगवान हनुमानाचे दर्शन घेतले.

याआधी इन्फोसिस समूहाचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती महाकुंभ मेळ्यात पोहोचल्या आहेत. परेड ग्राऊंडवर पर्यटन विभागाने बांधलेल्या महाराजा तंबूत सुधा मूर्ती मुक्काम करत आहेत. महाकुंभ मेळ्यात त्यांचा तीन दिवसीय मुक्काम आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ८ कोटी ३० लाखांहून अधिक भाविकांनी महाकुंभात स्नान केले आहे.

 

Exit mobile version