‘पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमक्यांना भारत भीक घालत नाही’

RSS पदाधिकारी राम माधव यांची प्रतिक्रिया

‘पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमक्यांना भारत भीक घालत नाही’

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताच्या दिशेने दिलेल्या अणु हल्ल्याच्या धमकीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी राम माधव यांनी ठामपणे सांगितले की, “मुनीरच्या अणु धमक्यांपासून कोणीही घाबरणार नाही. भारत एक सामर्थ्यशाली देश आहे आणि अशा प्रकारच्या धमक्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.”

राम माधव यांनी आज (१६ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “पाकिस्तानने वारंवार अशा प्रकारच्या बिनबुडाच्या धमक्या दिल्या आहेत, पण भारताची सामरिक ताकद, जागतिक स्थान आणि जनता यामुळे अशा धमक्यांचं काहीही परिणाम होत नाही.” त्यांनी हेही नमूद केलं की, “भारत शांततेचा पक्षधर आहे, मात्र जर कोणी आव्हान दिलं, तर उत्तर देण्याची पूर्ण क्षमता भारताकडे आहे.”

मुनीर यांनी अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात भारताच्या विरोधात अणुशक्ती वापरण्याचे संकेत दिले होते, ज्यामुळे दोन्ही देशांतील तणावाची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राम माधव यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. भारतीय राजकीय आणि सुरक्षा वर्तुळात या धमकीकडे “दक्षता आणि दुर्लक्ष” या दोन्ही भूमिकांतून पाहिले जात आहे. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेत बोलताना भारताविरुद्ध अणुहल्ल्याची धमकी दिली होती.

हे ही वाचा : 

राहुल गांधींवर का संतापले सतपाल महाराज?

पाकिस्तानमध्ये महापुरात ३०० पेक्षा जास्त मृत !

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात नवे आकर्षण काय ?

भाजपाचे चलो धर्मस्थळ अभियान काय आहे?

भारताकडून अस्तित्वाचा धोका निर्माण झाल्यास इस्लामाबाद “अर्धे जग नष्ट करेल” असा इशारा त्यांनी दिला होता. ते म्हणाले, “आपण एक अणुशक्तीसंपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटत असेल की आपण खाली जात आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन जाऊ.” दरम्यान, मुनीर यांच्या अणुहल्ल्याच्या धमकीनंतर त्यांच्यावर भारतातून टीका केली जात आहे. असीम मुनीर हे पाक लष्कर प्रमुख नसून दहशतवादी नेते असल्याचे भाजपा नेते हेमांग जोशी यांनी म्हटले होते.

Exit mobile version