एनआयए प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्रात परतणार

राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी आघाडीवर

एनआयए प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्रात परतणार

राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद वसंत दाते यांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये तात्काळ परत पाठवण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) सोमवारी मंजुरी दिली.

सध्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपत असल्याने, दाते यांचे नाव राज्याच्या पोलिस प्रमुखपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्यात आला असून, दाते यांची प्रतिनियुक्ती कमी करून त्यांना महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारकडून गृह मंत्रालयाकडे दाते यांच्या परतीसाठी विनंती करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, दाते यांची डिसेंबर २०२७ पर्यंत दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

हे ही वाचा:

जीनत अमान यांनी शेअर केला लेटेस्ट फोटोशूटचा अनुभव

कार अपघाताने जीवनाचे महत्त्व समजावले

बांगलादेशातील चीनी काड्यांची ‘डेलिओ’ कारणमीमांसा

आरईआयटी क्षेत्र जोमात
जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
१९९० च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या दाते यांनी शिक्षणासाठी बालपणी वर्तमानपत्रे वाटली. मर्यादित साधनांवर मात करत त्यांनी भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आजही त्यांची कारकीर्द तरुण अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरते.
दाते यांनी मुंबई पोलिस, सीबीआय तसेच विविध राज्य व केंद्रीय संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयाचे पहिले आयुक्त, मुंबई पोलिसात संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि गुन्हे शाखेतील संवेदनशील जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. २०२३ मध्ये त्यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली होती.

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांशी थेट सामना करत कामा आणि अल्ब्लेस रुग्णालयातून महिला व मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांनी दाखवलेले धैर्य इतिहासात नोंदले गेले आहे. या अद्वितीय शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Exit mobile version