‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ नाट्याविष्काराचे आयोजन

मुंबईत भव्य नाट्यप्रयोग

‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ नाट्याविष्काराचे आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघ संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या भव्य नाट्याविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. संघ संस्कार, राष्ट्रनिष्ठा आणि डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे नाट्यमय सादरीकरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सोमवार, २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या विशेष नाट्यप्रयोगाचे आयोजन नादब्रह्म, नागपूर यांनी केले आहे. प्रभाकर धानोरकर यांनी नाटकाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या नाट्याविष्काराचे लेखन डॉ. अजय प्रधान, दिग्दर्शन सुबोध सुर्जिकर आणि संगीत शैलेश दाणी यांचे आहे.

हे ही वाचा:

दोन चक्रीवादळांनी जपान हादरला; १० लाख नागरिकांना स्थलांतराचा इशारा

विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असते

अज्ञात क्षेपणास्त्राने तेलवाहू टँकरला लक्ष्य; तीन दिवसांतील दुसरी घटना

इंग्लंडमध्ये वैभवची खरी परीक्षा!

डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा, राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा आणि संघ स्थापनेमागील प्रेरणेचा वेध घेणारा हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मुंबईसह राज्यभरातील स्वयंसेवक, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक प्रेक्षक या भव्य नाट्याविष्काराला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघाच्या शताब्दी वर्षातील हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version