चेन्नईच्या किनारपट्टीवर १००० ऑलिव्ह रिडले कासव मृतावस्थेत !

मासेमारांवर कारवाई करण्याची मागणी 

चेन्नईच्या किनारपट्टीवर १००० ऑलिव्ह रिडले कासव मृतावस्थेत !

तामिळनाडूच्या चेन्नई किनारपट्टीवर गेल्या एका महिन्यात एक हजार हून अधिक ऑलिव्ह रिडले कासवे मृतावस्थेत आढळून आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कासवांच्या मृत्यूमुळे वन्यजीव संरक्षक आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या कासवांच्या मृत्यूचे मुख्य कारण अवैध मासेमारी असल्याचे सांगितले जात आहे. ऑलिव्ह रिडले कासव, जी भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित प्रजाती आहे. हा सागरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तत्काळ पावले न उचलल्यास ऑलिव्ह रिडले कासवाची परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे वन्यजीव तज्ज्ञांचे मत आहे. मासेमारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ऑलिव्ह रिडले कासवे दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून अंडी घालण्यासाठी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येतात. त्यांची संख्या कमी झाल्यास सागरी परिसंस्थेला हानी पोहोचू शकते. संवर्धनाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांची काळजी घेतली जात असली तरी, फक्त काही कासवे परिपक्व होवून अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्रात जातात.

हे ही वाचा : 

पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!

जेपीसीकडून वक्फ विधेयकातील १४ सूचनांना मान्यता; विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या फेटाळल्या

महाकुंभ: गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगींनी केले संगमात स्नान!

दिल्लीकरांचे संपूर्ण कुटुंबच केजरीवाल सरकार चालवणार; जाहीरनाम्यात १५ गॅरंटी

यावेळच्या घटना पूर्वीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मृत आढळलेली कासवे ही मृतांपैकी केवळ १० टक्केच असून समुद्रात ५,००० कासवांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, कासवांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाली आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ८ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मासेमारी करणारे ट्रॉलर किनाऱ्यापासून २-३ किलोमीटरच्या आत मासे पकडत आहेत. परिणामी, ट्रॉल आणि गिलच्या जाळ्यात कासव अडकतात आणि बुडून त्यांचा मृत्यू होतो. या बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी तत्काळ कारवाईची गरज असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

Exit mobile version