मानखुर्दमध्ये पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मुलाचा घेतला चावा

कुत्र्याचा मालक फरार, लोकांनी घेतली बघ्याची भूमिका

मानखुर्दमध्ये पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मुलाचा घेतला चावा

मुंबईच्या मानखुर्द भागात एका ११ वर्षांच्या मुलाला पिटबुल कुत्रा दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न अंगाशी आला, कारण कुत्र्याने त्या मुलावर हल्ला करून त्याला चावले. हा संपूर्ण प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून, आजूबाजूचे लोक हसत होते आणि मजा घेत होते, पण कोणतीही मदत करत नव्हते.

प्रकरण कसे घडले:

१७ जुलैला ही घटना घडली. मानखुर्द येथे हमजा या मुलावर या कुत्र्याने हल्ला केला. घटनेची पार्श्वभूमी अशीं की, हमजा आणि त्याचे मित्र रिक्शामध्ये खेळत होते, तेव्हा त्यांना एक पिटबुल कुत्रा दिसला. सर्वजण “पिटबुल! पिटबुल!” असे ओरडू लागले. तेव्हा कुत्र्याचा मालक सोहेल खान कुत्र्यासह ऑटोमध्ये आला. हे पाहून सर्व मुले घाबरून पळून गेली, मात्र हमजा वेळेत बाहेर पडू शकला नाही.

सोहेलने मुद्दाम कुत्रा आणला आणि हमजाला घाबरवले आणि कुत्रा त्याच्यावर सोडला. हमजाने जीव वाचवण्यासाठी ऑटोमधून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रा त्याच्या मागे धावत गेला आणि त्याला अनेक ठिकाणी चावले. हमजाने सांगितले की, “मी खूप घाबरलो होतो. कोणीच मदतीला आले नाही. सर्वजण फक्त बघत होते आणि व्हिडीओ शूट करत होते.”

हे ही वाचा:

मँडोलिनच्या जादूने सिनेविश्व गाजवणारे संगीतकार कोण ?

मँडोलिनच्या जादूने सिनेविश्व गाजवणारे संगीतकार कोण ?

पावसात ‘नीम’चे महत्त्व वाढते

पावसात ‘नीम’चे महत्त्व वाढते

वडिलांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात केली तक्रार

सोहेल खानविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे:कलम 291: निष्काळजीपणामुळे इतरांचे जीवन धोक्यात घालणे, कलम १२५: हेतुपुरस्सर इजा करणेकलम धोकादायक प्राणी वापरून इजा करणे

आरोपी सोहेल खान सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सामाजिक चिंता

हा प्रकार फक्त एक प्राण्याच्या हल्ल्याचा नाही, तर सामाजिक असंवेदनशीलतेचे भयानक उदाहरण आहे. मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढणे, हसणे, यावरून आपल्या समाजातील नैतिक आणि भावनिक उतरती कळा दिसून येते.

Exit mobile version