‘मोदींसारखा नेता पाकिस्तानलाही मिळावा’

पाकिस्तानी-अमेरिकन व्यावसायिक साजिद तरार यांनी केलं कौतुक

‘मोदींसारखा नेता पाकिस्तानलाही मिळावा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मजबूत नेते आहेत.भारताला नव्या उंचीवर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.निवडणुकीत त्यांचाच विजय होऊन नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून परत येतील, असे पाकिस्तानी-अमेरिकन व्यावसायिक साजिद तरार यांनी म्हटले आहे.तसेच पाकिस्तानलाही त्यांच्यासारखाच नेता मिळावा अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी वंशाचे असलेले साजिद तरार हे बाल्टिमोर येथे वास्तव्यास असून एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मजबूत नेता असल्याचे ते म्हणाले.पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना साजिद तरार म्हणाले की, नरेंद्र मोदी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशिया आणि जगासाठी चांगले आहेत आणि पाकिस्तानलाही त्यांच्यासारखा नेता मिळेल अशी आशा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला नव्या उंचीवर नेले असून ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून सत्तेवर येतील.

हे ही वाचा:

चिनी फंडिंगचे आरोप असलेल्या ‘न्यूज क्लिक’च्या संपादकांची अटक अवैध

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने गोळी झाडून केली आत्महत्या!

दिल्लीच्या विजयामुळे राजस्थान प्लेऑफमध्ये!

मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात दरवर्षी सुमारे ५.१४ कोटी व्यक्ती-वर्षांच्या रोजगाराची निर्मिती!

ते पुढे म्हणाले की, ‘मोदी हे अद्भुत नेते आहेत. तो जन्मजात नेता आहे. प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला भेट देणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत. मला आशा आहे की, ते पाकिस्तानशी चर्चा आणि व्यापार सुरू करतील. शांतताप्रिय पाकिस्तान भारतासाठीही चांगला आहे. मोदीजी हेच भारताचे पुढचे पंतप्रधान असतील, असे सर्वत्र लिहिले आहे, असे साजिद तरार म्हणाले.

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. मी तिथे मोदींची लोकप्रियता पाहत आहे आणि २०२४ मध्ये भारताचा उदय आश्चर्यकारक आहे. ही एक सांगण्यासारखी कथा आहे. भारतीय लोकशाहीतून लोक शिकतील हे तुम्हाला भविष्यात दिसेल, ते पुढे म्हणाले.

Exit mobile version