पाकिस्तानी घुसखोरीचा प्रयत्न उधळला, जवान हुतात्मा! 

परिसरात शोध मोहीम सुरू

पाकिस्तानी घुसखोरीचा प्रयत्न उधळला, जवान हुतात्मा! 

जम्मू आणि काश्मीरमधील उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून घुसखोरीचा मोठा प्रयत्न बुधवारी (१३ ऑगस्ट) भारतीय सैन्याने उधळून लावला. चुरुंडा परिसरात रात्री उशिरा झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान हुतात्मा झाला. लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घुसखोरी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) आणि दहशतवाद्यांनी १२ आणि १३ ऑगस्टच्या मध्यरात्री केली होती. लष्कराच्या सतर्कतेमुळे आणि जलद कारवाईमुळे घुसखोरांना पुढे जाण्यापूर्वीच रोखण्यात आले. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने पोस्ट केले की, “बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर ऑपरेशनल ड्युटी बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर हवालदार अंकित कुमारच्या बलिदानाबद्दल चिनार कॉर्प्स तीव्र शोक व्यक्त करते. चिनार वॉरियर्स त्यांच्या धाडसाला सलाम करतात आणि शोकग्रस्त कुटुंबासोबत उभे राहतात.”

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल भागातील जंगलात ऑपरेशन अखल सुरू आहे. १ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या ऑपरेशनने बुधवारी १२ व्या दिवशी प्रवेश केला. आतापर्यंत या ऑपरेशनमध्ये पाच दहशतवादी मारले गेले आहेत, तर भारतीय लष्कराचे लान्स नाईक प्रितपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग हुतात्मा झाले आहेत.

हे ही वाचा : 

दक्षिण कोरियाच्या किम कोन यांची चौकशी सुरु

सिद्ध झालंच, पाकिस्तान हा दीर्घकाळ कर्ज घेणारा देश

फर्निचर गोदामाला भीषण आग

सोनिया गांधी भारतीय नागरिक होण्यापूर्वीच येथे मतदार बनल्या

नियंत्रण रेषेवर अशांतता पसरवणे आणि खोऱ्यात दहशतवादी नेटवर्क सक्रिय ठेवणे या उद्देशाने अलिकडच्या काळात पाकिस्तानकडून घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत, असे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे. भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे की अशा कोणत्याही प्रयत्नांना योग्य उत्तर दिले जाईल आणि नियंत्रण रेषेवरील सर्व सुरक्षा व्यवस्था मजबूत केल्या जात आहेत.

Exit mobile version