‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या यशस्वी दहशतवादविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारशी संबंधित अनेक मीडिया आऊटलेट्स आणि सोशल मीडिया खात्यांनी या ऑपरेशनशी संबंधित तथ्यांचे विकृतीकरण करण्याच्या स्पष्ट प्रयत्नात दिशाभूल करणारी आणि काल्पनिक सामग्री प्रसारित केल्याचे उघड झाले आहे. बुधवारी भारतीय सशस्त्र दलांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) येथील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले, ज्यात अनेक जण ठार झाले.
ही कारवाई सीमापार दहशतवादाविरोधातील भारताच्या सातत्यपूर्ण लढाईतील एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सोशल मीडियावर बनावट बातम्यांचा पूर आला. यात पाकिस्तानी मीडिया हाऊस आणि संबंधित सोशल मीडिया हँडल्स सहभागी होते, ज्यांनी विशेषतः एक्स (माजी ट्विटर) प्लॅटफॉर्मवर, पडताळणी न झालेल्या आणि खोट्या कथा तयार केल्या.
हेही वाचा..
बलुच बंडखोरांनी पाक सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला उडवले; १२ सैनिक ठार
‘माझे वडील तुरुंगात शांत आयुष्य जगताहेत, पण मोदी त्यांना मारू इच्छितात’
गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू
पाकची लाज निघाली; भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा पुरावा मागताचं दिला सोशल मिडीयाचा हवाला
स्वतंत्र विश्लेषकांनी आणि भारताच्या अधिकृत तथ्य तपासणी यंत्रणांनी यातील अनेक दाव्यांना तात्काळ खोडून काढले. सर्वाधिक प्रसारित खोट्या दाव्यांपैकी एक म्हणजे पाकिस्तानने अमृतसरमधील एका भारतीय लष्करी तळावर बॉम्बहल्ला केल्याचा आरोप होता. या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी वापरलेला व्हिडीओ, ज्यामध्ये आकाशात आगीचे लोट दिसत होते, तो पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
फॅक्ट चेकमध्ये हेही निष्पन्न झाले की, तो व्हिडीओ २०२४ मध्ये चिलीच्या वालपाराइसो येथे लागलेल्या जंगलातील आगीचा होता. या नैसर्गिक आपत्तीचा भारत किंवा पाकिस्तानमधील कोणत्याही लष्करी कारवाईशी काहीही संबंध नव्हता. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विभागाने या खोट्या माहितीकडे लक्ष वेधत म्हटले: “पाकिस्तान प्रोपगंडा अलर्ट! पाकिस्तानस्थित हँडल्स अमृतसरमध्ये लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याचा खोटा दावा करत जुना व्हिडीओ पसरवत आहेत. हा व्हिडीओ २०२४ मध्ये जंगलात लागलेल्या आगीचा आहे. पडताळणी न केलेली माहिती शेअर करू नका आणि अचूक माहितीसाठी फक्त भारत सरकारच्या अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा.”
या स्पष्टीकरणांनंतरही, पाकिस्तानी इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या अनेक खात्यांनी अशाच प्रकारची सामग्री पसरवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानातील विविध स्रोतांकडून शेअर करण्यात आलेल्या अनेक फोटो आणि व्हिडीओ किंवा तर डिजिटलरित्या बदललेले होते किंवा मग अनेक वर्षांपूर्वीच्या अन्य घटनेचे होते. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींसुद्धा अशा खोट्या सामग्रीचे प्रसारण करत आहेत आणि निराधार प्रतिक्रियांचे दावे करत आहेत. विश्लेषकांनी या गोष्टीचे वर्णन असे केले आहे की, भारताच्या कारवाईनंतर जनतेच्या मनातील धारणा बदलण्यासाठी पाकिस्तानच्या माहिती यंत्रणेकडून राबवले गेलेले हे एक संगठित प्रयत्न आहेत.
खोट्या माहितीच्या प्रवाहावर नजर ठेवणारे तज्ज्ञ सांगतात की, जुन्या युद्धातील क्लिप्स आणि पुन्हा वापरलेले आपत्तींचे व्हिडीओ यांसारखी फेरबदल केलेली सामग्री वापरणे हे भारताविरोधात मानसिक चित्र तयार करण्याच्या पाकिस्तानच्या जुन्या पद्धतीचा एक भाग आहे. या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला उत्तर देताना, भारत सरकारने जनतेला आणि प्रसारमाध्यमांना अधिकृत स्रोतांवरूनच पडताळून घेतलेली माहिती वापरण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. अधिकार्यांनी खोट्या किंवा पडताळणी न केलेल्या बातम्यांच्या प्रसाराच्या धोक्यांविषयी सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.
