भारतात ॲपलची आयफोन १७ मालिका लाँच झाली आहे. लोक या फोनची आतुरतेने वाट पाहत होते. १९ सप्टेंबर, शुक्रवारी मुंबईतील बीकेसी जिओ सेंटरमधील ॲपल स्टोअरच्या बाहेर लाँचसाठी मोठी गर्दी जमली होती. या दरम्यान, गोंधळ उडाला आणि अनेकांनी एकमेकांशी हाणामारीही केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
आयफोन १७ सिरीजच्या लाँचिंगसाठी मुंबईतील बीकेसी जिओ सेंटरमधील अॅपल स्टोअरबाहेर मोठी गर्दी जमली होती. आयफोन खरेदीसाठी लोकांनी स्टोरबाहेर रात्री पासून गर्दी केली होती. या दरम्यान, गर्दीतील काही सदस्यांमध्ये हाणामारी झाली, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
हे ही वाचा :
ग्राहक इरफानने सांगितले की, “मी केशरी रंगाचा आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी आलो होतो. मी रात्री ८ वाजल्यापासून वाट पाहत आहे. यावेळी कॅमेरा आणि बॅटरीमध्ये बदल झाले आहेत आणि लूकही वेगळा आहे.” दरम्यान, मुंबईसह पुणे, बंगळूरू, दिल्लीतील स्टोरबाहेर गर्दी दिसून आली. ८२ हजार ते २ लाख २९ हजार पर्यंत आयफोन १७ च्या किंमती आहेत.
