दिल्लीत सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट!

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी विमानतळावर केले स्वागत

दिल्लीत सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट!

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती पदाचे एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सी. पी. राधाकृष्णन यांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्टकरत भेटीची माहिती दिली.

थिरू सी. पी. राधाकृष्णन जी यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकसेवेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि विविध क्षेत्रांतील त्यांचे योगदान आपल्या राष्ट्रासाठी अमूल्य ठरेल, असा मला विश्वास आहे. त्यांनी आजवर दाखवलेली निष्ठा आणि दृढ संकल्प याच वृत्तीने ते पुढेही राष्ट्राची सेवा करत राहोत, हीच माझी सदिच्छा, अशी पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

सीपी राधाकृष्णन कोण आहेत?

एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत आणि सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ते बराच काळ भाजप, आरएसएस आणि जनसंघाशी जोडलेले आहेत. यापूर्वी त्यांनी झारखंड आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे. ते पुद्दुचेरीचे उपराज्यपाल देखील राहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीपी राधाकृष्णन वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि जनसंघात सामील झाले. दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते कोइम्बतूर (तामिळनाडू) येथून लोकसभेचे खासदार राहिले आहेत.

पराष्ट्रपती निवडणुकीचा वेळापत्रक

  • निवडणूक आयोगाने जारी केलेली अधिसूचना – ०७ ऑगस्ट, २०२५ 
  • नामांकनाची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०२५ 
  • नामांकन अर्जांची छाननी तारीख – २२ ऑगस्ट २०२५ 
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२५ 
  • मतदान कोणत्या दिवशी होईल – ०९ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत. 
  • मतमोजणी – ०९ सप्टेंबर, २०२५  रोजी होणार असल्याची माहिती आहे.  
Exit mobile version