पंतप्रधानांचे पुतणे सचिन मोदी पोहोचले ‘महाकुंभात’, गायले कबीरांचे भजन! 

व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधानांचे पुतणे सचिन मोदी पोहोचले ‘महाकुंभात’, गायले कबीरांचे भजन! 
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभासाठी देशभरातून आणि जगभरातून लोक येत आहेत. आतापर्यंत सुमारे ८ कोटी भाविकांनी संगमात स्नान केले असून हा सिलसिला सुरूच आहे. दरम्यान, महाकुंभात भजन-कीर्तन गाणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दुसरे कोणी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतणे सचिन मोदी आहेत. मित्रांसोबत त्यांनी भजनाचा आनंद लुटला.  आपल्या दोन मित्रांसह त्यांनी संत कबीरांचे भजन गायले.
महाकुंभाच्या प्रवासात सामील झालेले सचिन मोदी यांचे दोन्ही मित्र सनदी लेखापाल आहेत. भजनातील मधुर स्वर आणि सोप्या शैलीने उपस्थित भाविकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. सचिन मोदी यांनी कोणतीही विशेष व्यवस्था न करता सामान्य भक्ताप्रमाणे महाकुंभात सहभाग घेतला.

 

यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधानांचे धाकटे भाऊ पंकज मोदीही दिसले. भक्ती आणि श्रद्धेच्या या उत्सवात या कुटुंबीयांनी गंगेत स्नान करून भजन आणि कीर्तनांचा आनंद लुटला. सचिन मोदी आणि त्याच्या मित्रांनी गायलेल्या भजनाचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोक त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी याचे वर्णन मोदी कुटुंबाच्या कौटुंबिक आणि आध्यात्मिक संबंधाचे प्रतीक म्हणून केले आहे.

हे ही वाचा : 

गायक अमीर हुसेन मगसौदलूला फाशी !

बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचे एन्काऊंटर फेक? पाच पोलिसांवर ठपका!

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मार्ग मोकळा

‘व्होट जिहाद पार्ट २’: छ.संभाजी नगरात बांगलादेशी-रोहिंग्यांकडून १० हजारहून अधिक अर्ज!

Exit mobile version