अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अक्षय शिंदेंच्या मृत्यूला ५ पोलीस जबाबदार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज मुंबई हाय कोर्टात मांडण्यात आला. अहवालामध्ये महत्वाची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत, ज्यामध्ये अक्षय शिंदेवर पाच पोलिसांनी अन्याय केल्याचे म्हटले आहे. पोलिसांकडून त्यावेळी जी फोर्स वापरण्यात आली ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
फोरेन्सिक रिपोर्ट आणि अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या जबाबानुसार अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर असल्याचे नोंदवण्यात आले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कारवाईच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या.
सरकारी वकील आणि राज्याचे महाधिवक्ता यांनी कोर्टामध्ये माहिती दिली कि या सर्व रिपोर्ट्सनुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यानुसार आता अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमध्ये सामील असलेल्या पोलिसांवर येणाऱ्या काळात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
‘व्होट जिहाद पार्ट २’: छ.संभाजी नगरात बांगलादेशी-रोहिंग्यांकडून १० हजारहून अधिक अर्ज!
हिंडेनबर्ग संस्थापक अँडरसन यांच्यावर सिक्युरिटीज फसवणुकीचा आरोप?
महाकुंभ : ८ व्या दिवशी २२ लाखांहून अधिक भाविकांची मेळ्याला भेट!
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती
दरम्यान, बदलापूच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोलीस रिमांडवर नेत असताना आरोपीने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला होता. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केला आणि त्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला होता.