बांगलादेशी-रोहिंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपा नेते किरीट सोमय्या आज (२० जानेवारी) छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोडला भेट देणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यात तब्बल १० हजार ६८ बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यातील बांग्लादेशी-रोहिंग्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली एक पत्र सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पत्रात छ. संभाजीनगर जिल्ह्यात किती बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, याची तालुकानिहाय आकडेवारी दिली आहे.
हे ही वाचा :
हिंडेनबर्ग संस्थापक अँडरसन यांच्यावर सिक्युरिटीज फसवणुकीचा आरोप?
महाकुंभ : ८ व्या दिवशी २२ लाखांहून अधिक भाविकांची मेळ्याला भेट!
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती
महाकुंभ २०२५: सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या १२ राज्यांच्या मंडपांची भाविकांना भुरळ
आकडेवारीनुसार संपूर्ण संभाजीनगर जिह्यातील ९ तालुक्यात तब्बल १० हजार ६८ बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ४ हजार ७३० अर्ज हे एकट्या सिल्लोडमधून केले गेले आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत सिल्लोडला भेट देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘व्होट जिहाद पार्ट २’ असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
सिल्लोड हा तालुका महायूतीचे आमदार अब्दुल सत्तार यांचा आहे. अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातून सर्वाधिक बांग्लादेशी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. किरीट सोमय्या आज भेट देणार आहेत. त्यामुळे याबाबत नवी माहिती समोर काय येते ते पाहावे लागेल.
VoteJihad Part 2
Today afternoon 1pm, I am visiting SILLOD
Bangladeshi Rohingyas Birth Certificate Scam
Chhatrapati Sambhaji Nagar District including 9 tehsil have 10,068 application for Birth Certificate
of this Sillod Tehsil have 4,730 applications of Bangladeshi Rohingyas pic.twitter.com/obHqL6QQqX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 20, 2025