प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याने केवळ देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातील भाविक मोठ्या आनंदात या मेळ्यात सहभाग घेण्यासाठी भारतात येत आहेत. हिंदू संस्कृतीच्या भव्यतेसोबतच भारताच्या सांस्कृतिक विविधता आणि एकतेचे दर्शन लोकांना येथून मिळत आहे.
देशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणारे नागालँड आणि लेहसह १२ राज्यांतील मंडप, भारताच्या वारसा आणि संस्कृतीच्या आकर्षणाचे प्रतीक बनले आहेत. विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे १२ भव्य मंडप महाकुंभमध्ये उभारण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीने, मंत्र्यांनी वैयक्तिकरित्या देशभरात आणि परदेशात निमंत्रणे दिली होती आणि परिणामी याला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला आहे. योगी सरकारच्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे सर्व राज्यांची सांस्कृतिक समृद्धी एकाच ठिकाणी एकत्र आणण्यात आली आहे.
सेक्टर ७ मध्ये, दादरा आणि नगर हवेली, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, नागालँड आणि लडाखमधील संस्कृतींचे दर्शन घेऊ शकतात. या वर्षी मध्य प्रदेशची संस्कृती दाखवणारे मंडप आदिवासी भगोरिया नृत्याच्या सादरीकरणामुळे भाविकांना आणि प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. होळीपूर्वी भगोरिया उत्सवादरम्यान हे नृत्य केले जाते. हे नृत्य ड्रम्सच्या तालावर आणि रंगीबेरंगी पोशाख करून गुलाल उधळत केले जात आहे. त्यामुळे महाकुंभामधील ते एक आकर्षणबनले आहे. आदिवासी संस्कृती आणि तिच्या खोलवर रुजलेल्या परंपरांचे जतन करण्याबद्दलही या नृत्यातून एक संदेश दिला जात आहे. दर १० दिवसांनी धार्मिक चित्रपट दाखवले जातात, तर लोकनृत्य आणि संगीताचे प्रदर्शन दररोज संध्याकाळी ६ ते १० या वेळेत दाखवले जात आहे.
मध्य प्रदेश मंडपात बसवलेले वैदिक घड्याळ भाविकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. वैदिक घड्याळ, जगातील पहिले भारतीय ‘पंचांग’ आधारित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथे गेल्या वर्षी याचे अनावरण करण्यात आले. तो मंडपाबाहेर लावण्यात आला असून ते पाहण्यासाठी खास दूरदूरवरून भाविक सेक्टर ७ मध्ये दाखल होत आहेत.
हे ही वाचा :
४७१ दिवसांच्या कैदेनंतर गाझामधून ‘त्या’ तिघी परतल्या!
ठाण्यातील लेबर कँपला किरीट सोमय्यांची भेट, १२ पैकी ९ बांगलादेशी आढळले!
शेखर यादव यांच्या समान नागरी कायद्याबाबतच्या वक्तव्याविरोधात डावे एकवटले!
प्रयागराज: महाकुंभ परिसरात भीषण आग!
राजस्थानचा मंडप देखील महाकुंभात एक प्रमुख आकर्षण बनला आहे, जो आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. हवा महल, जयगढ किल्ला, चित्तौडगड किल्ला आणि विजय स्तंभ यासह राजस्थानच्या प्रसिद्ध वास्तूंची झलक यात दिसून येत आहे. भाविकांचे मंडपात खास स्वागत केले जात असून भक्तांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ४५ दिवस राजस्थानचे लोकसंगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहुण्यांना भुरळ घालत राहतील.
गुजरातचे गरबा, आंध्र प्रदेशचे कुचीपुडी, उत्तर प्रदेशचे जोगिनी नृत्य, उत्तराखंडचे छोलिया आणि छत्तीसगडचे छेरछेरा नृत्य महाकुंभात आपली खास ओळख निर्माण करत आहेत. प्रत्येक राज्याने आपला सांस्कृतिक वारसा अनोख्या पद्धतीने मांडला आहे. दादरा नगर हवेलीचे मुखवटा नृत्य, नागालँडचे चांगलो आणि लडाखने गोंडोल हे ही विशेष लक्ष वेधून घेत आहेत.