नोव्हेंबर २०२३ नंतर प्रथमच, ७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान बंधक बनवलेल्या तीन ओलिसांची हमासने सुटका केली. गाझामध्ये ४७१ दिवस कैदेत राहिल्यानंतर या तीन महिला इस्रायलला परतल्या आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली. या करारांतर्गत रोमी गोनेन (वय २४ वर्षे) एमिली डमारी (वय २८ वर्षे) आणि डोरेन स्टेनब्रेचर (वय ३१ वर्षे) या तीन जणांची सुटका झाली आहे. गोनेन हिचे सुपरनोव्हा संगीत महोत्सवातून अपहरण करण्यात आले होते, तर डमारी आणि स्टीनब्रेचर यांना किबुत्झ केफर आझा येथील त्यांच्या घरातून नेण्यात आले होते. या तिन्ही महिलांची शारीरिक स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.
करारानुसार रविवारी संध्याकाळी मुखवटा घातलेल्या हमासच्या बंदूकधाऱ्यांनी मध्य गाझा शहरातील सराया स्क्वेअर येथे तीन महिलांना रेड क्रॉसकडे सुपूर्द केले. यावेळी मोठी गर्दी जमली होती. ओलीस हमासच्या लष्करी वाहनातून खाली उतरल्या आणि त्वरीत रेड क्रॉसच्या एसयूव्हीमध्ये चढल्या. इस्रायली सैन्याच्या रेड क्रॉसने ओलिसांना गाझा पट्टीतील विशेष सैन्याकडे सुपूर्द केल्याचा क्षण दाखविणारे फुटेज जारी केले, तसेच त्यांनी सीमा ओलांडून परत इस्रायलमध्ये प्रवेश केला. यानंतर इस्रायलमध्ये दाखल झाल्यानंतर ओलिसांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सदस्यांची भावनिक भेट घेतली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तब्बल ४७१ दिवसानंतर झालेल्या भेटीचा आनंद फोटोंमधून दिसून येत आहे. तर, पहिल्या दिवशी इस्रायलने ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.
Held hostage by Hamas for 471 days, Romi Gonen, Emily Damari and Doron Steinbrecher have returned to Israel and have been reunited with their families.
(Pic source – Israel Defence Forces/X) pic.twitter.com/kSZG37UvTy
— ANI (@ANI) January 19, 2025
हे ही वाचा :
ठाण्यातील लेबर कँपला किरीट सोमय्यांची भेट, १२ पैकी ९ बांगलादेशी आढळले!
शेखर यादव यांच्या समान नागरी कायद्याबाबतच्या वक्तव्याविरोधात डावे एकवटले!
प्रयागराज: महाकुंभ परिसरात भीषण आग!
आव्हाड भाऊ आरोपी मोहम्मद शहजाद आहे बरं!
कराराच्या ४२ दिवसांच्या पहिल्या टप्प्यात सर्व ३३ ओलिसांची सुटका करण्याच्या बदल्यात, इस्रायल, पहिल्या टप्प्याच्या अखेरीस, प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांसाठी अनेक जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या १,९०४ पॅलेस्टिनी कैदी आणि बंदिवानांना सुपूर्द करणार आहे. या करारांतर्गत नवीन सुटका शनिवारी होणार आहे, जेव्हा आणखी चार महिला ओलिसांची सुटका केली जाईल. कराराच्या पहिल्या टप्प्यात मुक्त केले जाणारे सर्व ३३ ओलिस हे महिला, मुले, ५० वरील पुरुष आणि जखमी पुरुष असणार आहेत.