अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी ठाण्यातील लेबर कँपमधून अटक केली होती. अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाण्यातील लेबर कँपला भेट दिली. या लेबर कँपमध्ये अनेक बांगलादेशी मुस्लीम असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. लेबर कँपमध्ये ९ बांगलादेशी मुस्लीम होते, हे सर्वजण पश्चिम बंगालचे असल्याचे त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्या म्हणाले, कावेसर ठाणे येथील लेबर कॅम्पला भेट दिली, जिथे मोहम्मद सेहजाद ३ महिने राहत होता. लेबर ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला आम्ही भेट दिली. मी १२ कामगारांना भेटलो, त्यातील ९ बांगलादेशी मुस्लिम होते (इम्मान हुसेन, अमीर सोहेल…). चौकशी दरम्यान त्यांनी मालदा येथील रहिवासी असल्याचे सांगितले, परंतु त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते.
हे ही वाचा :
शेखर यादव यांच्या समान नागरी कायद्याबाबतच्या वक्तव्याविरोधात डावे एकवटले!
प्रयागराज: महाकुंभ परिसरात भीषण आग!
ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरवर दु:खाचा डोंगर, मामा-आजीचा अपघातात मृत्यू!
आव्हाड भाऊ आरोपी मोहम्मद शहजाद आहे बरं!
ते पुढे म्हणाले, काहींकडे आधारकार्ड होते, तर काहींकडे इन्कम टॅक्सचे पॅनकार्ड. याबाबत कोम्बिंग ऑपरेशनसाठी माझ्याकडून पोलीस आयुक्तांशी बोलणे सुरु आहे. स्थानिक पोलिसांना भेट देत येथील प्रत्येक लेबरची चौकशी करून त्यांची कागदपत्रे तपासणी करण्यास सांगितले. तपासणीमध्ये यातील ७०-८० टक्के लेबर हे बांगलादेशी सापडणार, याची मला खात्री आहे आणि यांना बांगलादेशला परत पाठवणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
मुंबई आणि ठाणे आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. सगळ्या बांधकाम साईट चेक करण्यास सांगितले आहे. पूर्वी आंध्र प्रदेशहून लेबर येत होते आता बांगलादेशमधील लेबर बांधकाम साईटवर मोठ्या प्रमाणात स्थायिक आहेत. आठवड्याभरात मी पाठ पुरावा करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
I visited Labour Camp at Kavesar Thane, where Mohammad Sehzad was staying for 3 month
I met 12 worker, 9 were Bangladeshi Muslim (Imman Husein, Amir Sohel…..). They say they are from Malda but No Authentic Documents
I talk to Police Comisioner for Combing Operation pic.twitter.com/hCQZruoq14
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 19, 2025