अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीचे बांगलादेशी कनेक्शन समोर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका, टिप्पणी केली जात आहे. आरोपीच्या अटकेपूर्वी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी तर अभिनेत्याच्या मुलाच्या नावावरून बोट ठेवले आणि त्यामुळे अभिनेत्याचा मुलगा कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला असल्याचे म्हटले होते. याच दरम्यान, प्रकरणातील मुख्य आरोपी सापडला असून तो बांगलादेशचा समोर आले आहे. यानंतर आता सत्ताधारी नेत्यांकडून विरोधकांवर टीका केली जात आहे. यावरून शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.
अभिनेत्यावर हल्ल्याच्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटकरत म्हटले, प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले. तैमुर समाज माध्यमांन मध्ये जग भरात प्रचंड लोकप्रिय झाला नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून ,प्रथेनुसार ठेवली जात होती.
त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव “तैमूर” असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे.
हे ही वाचा :
सैफ अली खानवर हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा न्यायालयात दावा!
बंगाल सरकारकडून अनेक बांगलादेशींची भारतात तस्करी!
दुचाकी क्रमांक आणि चेहरा ओळखण्यात आल्याने आरोपी सापडला
मातोश्रीत बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार का?
सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही. तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की, सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
यावर आता नरेश म्हस्के म्हणाले, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे बरं आव्हाड भाऊ. ते पुढे म्हणाले, सैफच्या हल्लेखोराचे नाव द्वेषाच्या आगीत समाजाला ढकलणारे उगाच घेतात डोक्यावर गाव, सतत धर्म, जात, पंथ यात लोकांना फोडायचे वर पुरोगामित्वाचे कातडे अंगभर ओढायचे. सेफ नाहीये माणसापासून माणूस हेच फक्त सत्य आहे, गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून पाहण्यातच तथ्य आहे. बघा जमलं तर सुधारा स्वतःला वैयक्तिक स्वार्थासाठी तोडू फोडू नका समाजाला तैमुर लाही आज कळलंच असेल बांगलादेशी मोहम्मद ‘च्या वावरात ‘ सैफ ‘ही सेफ नसेल, असे नरेश म्हस्के म्हणाले.
' मोहम्मद ' #mohammadshehzad आहे बरं @Awhadspeaks भाऊ #सैफ च्या हल्लेखोराचे नाव
द्वेषाच्या आगीत समाजाला ढकलणारे
उगाच घेतात डोक्यावर गावसतत #धर्म, #जात, #पंथ यात लोकांना फोडायचे
वर पुरोगामित्वाचे कातडे अंगभर ओढायचे#सेफ नाहीये माणसापासून माणूस
हेच फक्त #सत्य आहे
गुन्हेगाराला… pic.twitter.com/YaFUnFJxqZ— Naresh Mhaske (@nareshmhaske) January 19, 2025