29.5 C
Mumbai
Tuesday, May 19, 2026
घरदेश दुनियापंतप्रधान मोदी नॉर्वेमध्ये दाखल; पंतप्रधान स्टोरे यांनी केले स्वागत

पंतप्रधान मोदी नॉर्वेमध्ये दाखल; पंतप्रधान स्टोरे यांनी केले स्वागत

४३ वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा पहिला नॉर्वे दौरा

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेमध्ये दाखल झाले असून नॉर्वेचे पंतप्रधान योनास गार स्टोरे यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी भारत आणि नॉर्वेचे अनेक अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले, “मी ओस्लो येथे पोहोचलो आहे. विमानतळावर स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान योनास गार स्टोरे यांचा आभारी आहे. चार दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला नॉर्वे दौरा आहे. या भेटीमुळे भारत- नॉर्वे मैत्रीला नवी ऊर्जा मिळेल, असा मला विश्वास आहे. मी महामहिम राजा हेराल्ड पाचवे आणि राणी सोन्या यांची भेट घेणार असून पंतप्रधान स्टोरे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहे.”

पंतप्रधान मोदी यांचा नॉर्वेचा पहिलाच दौरा असून तब्बल ४३ वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा नॉर्वे दौरा होत आहे. नॉर्वे हा भारताचा महत्त्वाचा भागीदार देश मानला जातो. सोमवारी पंतप्रधान मोदी विविध द्विपक्षीय बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत, तर मंगळवारी (१९ मे) ते तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. या दौऱ्यामुळे भारत-नॉर्वे संबंधांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारत आणि नॉर्वे यांच्यातील आर्थिक संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे २.७३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. तसेच नॉर्वेच्या सरकारी वेल्थ फंडाने भारतीय बाजारात सुमारे २८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारत आणि संपूर्ण नॉर्डिक क्षेत्रातील एकूण व्यापार सुमारे १९ अब्ज डॉलर्स इतका असल्याचे सांगितले जाते. या नॉर्डिक परिषदेत नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड आणि स्वीडनचे सर्वोच्च नेतेही सहभागी होणार आहेत. भारत-नॉर्डिक शिखर परिषदेची सुरुवात २०१८ मध्ये स्टॉकहोम येथे झाली होती, तर दुसरी परिषद २०२२ मध्ये कोपनहेगन येथे आयोजित करण्यात आली होती.

हे ही वाचा:

बंगालमध्ये मौलांनांची भाषा बदलली… गाईचं मांस खाऊ नका, तिला राष्ट्रीय प्राणी घोषित करा!

“भारत समजून घेण्यात कमतरता” प्रेस स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भारताची भूमिका

जिहादी कारवायांआधी त्याला हेअर ट्रान्सप्लांट करावेसे वाटले!

व्हीडी सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

यंदाच्या बैठकीत हरित ऊर्जा, डिजिटायझेशन, संरक्षण सहकार्य, अंतराळ तंत्रज्ञान, आर्क्टिक धोरण आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नॉर्वेचे पंतप्रधान योनास गार स्टोरे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही पंतप्रधान भारत-नॉर्वे बिझनेस अँड रिसर्च समिटला संबोधित करणार असून आर्थिक आणि संशोधन सहकार्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा