30.3 C
Mumbai
Monday, May 18, 2026
घरक्राईमनामाजिहादी कारवायांआधी त्याला हेअर ट्रान्सप्लांट करावेसे वाटले!

जिहादी कारवायांआधी त्याला हेअर ट्रान्सप्लांट करावेसे वाटले!

एनआयएच्या ताब्यात असलेल्या जटने दिली माहिती

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्यासाठी भारतात घुसखोरी करणाऱ्या पण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या मोहम्मद उस्मान जटने वेगळीच माहिती दिली आहे. लष्कर ए तैय्यबाशी संबंधित असलेल्या या दहशतवाद्याने सांगितले की, डोक्यावरील कमी केसांमुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता. त्यामुळे तो अस्वस्थ होता, आपल्या कारवाया थांबवत त्याने प्रथम केसांचा प्रश्न सोडविण्याकडे लक्ष दिले.

मोहम्मद उस्मान जट उर्फ “चायनीज” याची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. अटकेनंतरच्या चौकशीत त्याने सांगितले की, अनेक वर्षांच्या केसगळतीमुळे त्याचा आत्मविश्वास खूप कमी झाला होता आणि हेअर ट्रान्सप्लांटसारख्या प्रक्रिया फक्त पाश्चात्य देशांमध्येच उपलब्ध असतात, असे त्याला वाटत होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा आटापीटा सुरू होता.

काश्मीरमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचा निर्णय

अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाहोरचा रहिवासी आणि प्रशिक्षित एलईटी दहशतवादी असलेला जट्ट जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याच्या सूचनांसह उत्तर काश्मीरमार्गे घुसला होता. तो उत्तर आणि मध्य काश्मीरमध्ये सक्रिय होता आणि अनेक दहशतवादी कारवायांशी त्याचे संबंध होते.

हे ही वाचा:

‘नीट’ पेपरफुटी प्रकरण: आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

चीनमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप; दोघांचा मृत्यू

ट्रम्प रिकाम्या हाताने परतले, मोदींचा धमाका…

कोकणचा आंबा… काजू… आणि ताठ मानेचा शेतकरी!

मात्र चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, काश्मीरमधील जीवन हे पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांमध्ये त्याला शिकवण्यात आलेल्या गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.

श्रीनगरच्या उंच भागात राहत असताना त्याची भेट पाकिस्तानी दहशतवादी झरगम आणि अबू हुरेरा यांच्याशी झाली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, झरगमने त्याची ओळख एका दुकान मालकाशी करून दिली ज्याने आधीच हेअर ट्रान्सप्लांट केले होते. त्यानंतर जट्टने त्या व्यक्तीकडे वारंवार जाऊन उपचाराची व्यवस्था करण्याची विनंती केली.

नंतर त्याने श्रीनगरमधील एका क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करून घेतला आणि उपचार प्रक्रियेच्या काही टप्प्यांदरम्यान तेथे रात्रीही मुक्काम केला.

प्रवास आणि पळून जाण्याची योजना

उपचारानंतर जट्ट प्रवासी वाहनाने जम्मूला गेला आणि तेथून स्लीपर बसने पंजाबमधील मलेरकोटलाला पोहोचला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिथे तो तुर्की मालिका पाहण्यात आणि इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवत होता.

चौकशीत त्याने आणखी एक योजना उघड केली. त्याला खरे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि नंतर पासपोर्ट मिळवून भारतातून पळून जायचे होते. ही योजना उमर तथा खरगोश या पाकिस्तानी दहशतवाद्यासारखी होती, जो बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतातून पळून जाऊन इंडोनेशियामार्गे गल्फ देशात पोहोचला होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जट्टच्या खुलाशांमुळे श्रीनगर आणि उत्तर काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या ओव्हर ग्राऊंट नेटवर्कचाही पर्दाफाश झाला. त्याने दहशतवाद्यांना आसरा, आर्थिक मदत आणि लॉजिस्टिक सहाय्य पुरवणाऱ्या अनेक लोकांची माहिती दिली.

गेल्या महिन्यात अटक

७ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर पोलिसांनी आंतरराज्यीय एलईटी नेटवर्कचा भांडाफोड करून पाच जणांना अटक केली होती. यामध्ये १६ वर्षांपासून फरार असलेला अबू हुरेरा याचाही समावेश होता. मोहम्मद उस्मान जट यालाही या कारवाईदरम्यान अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि हरियाणामधील १९ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये दहशतवाद्यांना आश्रय, आर्थिक मदत आणि लॉजिस्टिक सुविधा पुरवणारे मोठे नेटवर्क उघडकीस आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा