अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. याच दरम्यान, बांगलादेशी विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य समोर आले आहे. मातोश्रीत बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नितेश राणे म्हणाले, सैफ अली खानवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा आपल्याला जाग येते कि बांगलादेशींकडून आपल्याला धोका आहे, याचे आश्चर्य वाटते. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी चालल्या आहेत. डिलिवरी करणारा एका व्यक्ती आपल्या घरापर्यंत येतो, त्याची पार्श्वभूमी काय, त्याचे आधार कार्ड त्याच्याच नावाने आहे का?.
हे ही वाचा :
सैफच्या हल्लेखोराने याआधीही त्याच्या घरी दिली होती भेट
दिल्ली निवडणुकीनंतरच भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष!
कानपूरमध्ये १,६७० मालमत्तांवर वक्फ बोर्डाचा दावा
सैफ अली खान वर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, ठाण्यातून अटक
ते पुढे म्हणाले, आपल्या शहरामध्ये राहणारी लोक आहेत, जी एका घरामध्ये ५०-६० जण राहत आहेत. प्रत्येकांकडे २-३ आधार कार्ड आहेत. मुंबई करांच्या हक्काचे वीज, पाणी हे वापरत आहेत. अशा बाबतीत आम्ही सातत्याने बोलत आलो आहोत. मतं मिळविण्यासाठी आम्ही हे केले नाही. या प्रकरणी राज्यात गेल्या तीन चार वर्षात १०८ मोर्चे काढले असल्याचे त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारत सरकार अपयशी असल्याचे म्हटले. यावर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, आता मातोश्रीत बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार आहे का?. मविआचे सरकार असते तर त्यांनी बांगलादेशींची आरती केली असती, अशी टीका नितेश राणे यांनी केली.