बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे बांगलादेशी कनेक्शन समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आज (१९ जानेवारी) कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे बांगलादेशी कनेक्शन समोर आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विशेष करून भाजपाच्या नेत्यांकडून कारण, मागील काही वर्षांपासून बांगलादेशी नागरिक, रोहिंग्याबाबत आवाज उठवत आहेत. अशातच भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी याबाबत प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे.
कैलाश विजयवर्गीय म्हणाले, “बंगाल सरकारकडून अनेक बांगलादेशींची भारतात तस्करी केली जात आहे. त्यांची आधारकार्डे हिंदूंच्या नावाने बनवली जात आहेत. इथे येऊन ते गुन्हे करत आहेत. सध्या सायबर गुन्हे सुरू आहेत, जे बांगलादेशातील लोक आहेत. “बांगलादेशी लोकांच्या गुन्हेगारी कारवाया ही चिंतेची बाब आहे. सरकारने यावर कडक निर्णय घेतला आहे. यावर आवश्यक ती कारवाई करणे आवश्यक असल्याचे कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला आज बांद्रातील हाॅलीडे कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला कामावर ठेवणारा मुकादम पांडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. तसेच भारतात शिरकाव करण्यासाठी त्याला कोणी मदत केली, याचाही तपास पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा :