ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकर यांच्या आजी आणि मामाचा अपघाती मृत्यू झाला आहे. सकाळी (१९ जानेवारी) महेंद्रगड बायपासवरील चरखी दादरी रोडवर ही घटना घडली. नुकताच मनू भाकर यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनू भाकरची आजी सावित्री देवी या यशाने खूप आनंदी होत्या, मात्र आज त्यांचा अपघातात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मनू भाकर यांचे मामा युधवीर आणि त्यांच्या आजी सावित्री हे दोघे दुचाकीवरून जात होते. याच दरम्यान, महेंद्रगड बायपास रोडवरील कालियाना वळणाजवळ, भरधाव वेगात असलेल्या ब्रेझा कारने चुकीच्या दिशेने येऊन त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की युधवीर आणि सावित्री या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा :
आव्हाड भाऊ आरोपी मोहम्मद शहजाद आहे बरं!
बंगाल सरकारकडून अनेक बांगलादेशींची भारतात तस्करी!
सैफ अली खानवर हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा न्यायालयात दावा!
मातोश्रीत बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार का?
ब्रेझा कारही रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. युधवीर आणि सावित्री हे भिवानी जिल्ह्यातील कलाली गावचे रहिवासी होते.