31 C
Mumbai
Thursday, May 28, 2026
घरविशेषपोर्शे अपघातातील आरोपी मुलाचे आईवडील नृत्य, हास्यविनोदात दंग, लोकांचा संताप

पोर्शे अपघातातील आरोपी मुलाचे आईवडील नृत्य, हास्यविनोदात दंग, लोकांचा संताप

व्हीडिओ झाला व्हायरल

Google News Follow

Related

बम्बई से आया मेरा दोस्त हे १९७७च्या जमान्यातले प्रसिद्ध बॉलिवूड गाणे वाजत असताना त्यावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या पुण्यातील पोर्शे उपघात प्रकरणातील आरोपीचे अगरवाल कुटुंब नाचताना दिसत आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या आदेशाचा आनंद हे कुटुंब साजरा करत होते. त्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

मे २०२४  मध्ये पुण्यात दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोन अभियंत्यांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखालील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना १० मार्च रोजी जामीन मंजूर झाला होता. जामीन आदेशानंतरच्या दिवसांतील हा व्हीडिओ आहे. या एका व्हिडिओमध्ये विशाल अगरवाल मित्र आणि कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करताना दिसत आहेत.

आता व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अगरवाल आपल्या पत्नी आणि मुलासोबत नाचताना दिसत आहेत. त्यांच्या गळ्यात दोन हार आहेत. एक गुलाबी फुलांचा आणि दुसरा नोटांनी बनवलेला हार आहे. या व्हीडिओत असेही दिसते की, लाईव्ह बँड सुरू असताना असताना त्यांचा मुलगा त्यांना उचलतो आणि संपूर्ण कुटुंब आनंद व्यक्त करताना दिसते.

त्यांची पत्नीही नोटांच्या हारासह नाचताना दिसत आहे. नंतरच्या दृश्यात अगरवाल यांना दुसरा एक व्यक्ती उचलून घेतो, तर त्यांचा मुलगा आपल्या आईला उचलतो. त्यानंतर सर्वजण नाचत, हसत आणि आनंद साजरा करताना दिसतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संतापाचा विषय ठरला आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळून पाहता आलेली नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा!

केरळमध्ये ईडीच्या छाप्यानंतर मोठा तणाव

‘न्यू नागपूर’ प्रकल्पांसाठी ₹६३७ कोटींच्या मुद्रांक शुल्काला माफी

महाराष्ट्रात ८९ हजार कोटींच्या हायटेक प्रकल्पांना हिरवा कंदील

अल्पवयीन आरोपीच्या पालकांना का अटक झाली?

विशाल अगरवाल आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत नव्हता हे दाखवण्यासाठी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्याचा प्रयत्न पालकांनी केला होता असा आरोप आहे. तसेच, त्यांनी त्यांच्या चालकावर अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भुईयां यांच्या खंडपीठाने विशाल अगरवाल यांना जामीन मंजूर केला. आरोपी गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्याने जामिनासाठी योग्य कारणे दाखवली आहेत. खटल्याच्या न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर करण्यात येतो,” असे न्यायालयाने म्हटले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने अगरवाल यांना या प्रकरणातील साक्षीदारांशी संपर्क साधण्यास मनाई केली आहे.

अश्विनी कोस्टाचे वडील सुरेश कोस्टा यांनी अगरवाल कुटुंबियांच्या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी प्रकट केली. एका सभ्य समाजात असे वर्तन योग्य ठरते का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

पुणे पोर्शे प्रकरण

१९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत पोर्शे कार चालवत दोन जणांना चिरडल्याचा आरोप आहे. या अपघातात अनिष अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर अवघ्या १५ तासांत किशोरवयीन चालकाला जामीन देण्यात आला होता. बाल न्याय मंडळाने त्याला १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आणि रस्ते सुरक्षेवर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयानंतर देशभरात संताप व्यक्त झाला, त्यानंतर त्या मुलाला निरीक्षणगृहात पाठवण्यात आले.

७ जून २०२५ रोजी बाल न्याय मंडळाने त्या मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याचा आदेश दिला होता, मात्र एका महिन्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
309,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा