“आतंक का साथी राहुल गांधी” अमेठीत राहुल गांधींच्या दौऱ्यानिमित्त का लागले पोस्टर्स?

पोस्टर्समधून काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीवर निशाणा

“आतंक का साथी राहुल गांधी” अमेठीत राहुल गांधींच्या दौऱ्यानिमित्त का लागले पोस्टर्स?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेठी दौऱ्यापूर्वी बुधवार, ३० एप्रिल रोजी तेथे पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सच्या माध्यमातून कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान समर्थक भूमिका घेतल्याबद्दल कॉंग्रेस आणि ‘इंडी’ आघाडीला लक्ष्य करण्यात आले होते.

राहुल गांधी हे रायबरेली आणि अमेठीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या पोस्टर्सवर लिहिले होते की, “इंडीचा हात पाकिस्तानसोबत”. शिवाय पोस्टरवर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली विधाने छापण्यात आली होती. तर, राहुल गांधींना दहशतवादाचे साथीदार (“आतंक का साथी राहुल गांधी”) असे म्हणण्यात आले होते. उत्तर प्रदेश शहरात अशाच प्रकारचे बॅनर लावण्यात आले होते ज्यात इंडी आघाडीच्या नेत्यांनी पाकिस्तान समर्थित केलेल्या विधानांवरून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते.

हे ही वाचा : 

१९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती!

भारतीय सैन्य दलासोबत संपूर्ण देश

दिसायला लहान पण उपयोग भरपूर, ‘मनुका’ खा

रावळपिंडीमध्ये उपचारासाठी फिरणाऱ्या रुग्णांचे हाल

पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर देण्याची योजना आखत असताना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस, संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, काही काँग्रेस नेते माध्यमांशी बोलत आहेत. ते स्वतःची भूमिका मांडत आहेत ही पक्षाची भूमिका नाही. या संवेदनशील काळात काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी व्यक्त केलेले विचार आणि अधिकृत एआयसीसी पदाधिकाऱ्यांचे विचार हे काँग्रेसच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करतात यात शंका नाही.

Exit mobile version