अल्पप्रतिसादामुळे रेल्वेकडून गाड्या रद्द

अल्पप्रतिसादामुळे रेल्वेकडून गाड्या रद्द

महाराष्ट्रात सध्या कोविडचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. त्यामुळे सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे लोकांच्या प्रवासावर मर्यादा आहे. सहाजिकच रेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

सरकारच्या संचारबंदीच्या धोरणामुळे लोकांनी प्रवास टाळायला सुरूवात केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम रेल्वेवर झाला असून, मध्य रेल्वेच्या  सुमारे १० प्रवासी गाड्या १० मेपर्यंत रद्द करण्यात आल्यात. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्यानं चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवासी कमी असल्यानं या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय.

हे ही वाचा:

भिलाईतून ऑक्सिजन, गडकरींची भलाई

कोरोना झाला तर ‘या’ कंपनीत २१ दिवसांची पगारी सुट्टी

१ मे पासून भारतात येणार रशियन स्पुतनिक व्ही लस

कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’

मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी- मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर – पुणे, दादर -शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अशा गाड्या रद्द करण्यात आल्यात. गाड्या तोट्यात चालत असल्याने रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलंय.

रेल्वेने रद्द केलेल्या विशेष गाड्या खालीलप्रमाणे

1) ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड विशेषच्या फेऱ्या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

2) ट्रेन क्रमांक 02110 मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेषच्या फेऱ्या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

3) ट्रेन क्रमांक 02113 पुणे -नागपूर विशेषच्या फेऱ्या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

4) ट्रेन क्रमांक 02114 नागपूर -पुणे विशेषच्या फेऱ्या दि. 27.04.2021 पासून दि. 09.05.2021 पर्यंत रद्द

5) ट्रेन क्रमांक 02189 मुंबई -नागपूर विशेषच्या फेऱ्या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

6) ट्रेन क्रमांक 02190 नागपूर -मुंबई विशेषच्या फेऱ्या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

7) ट्रेन क्रमांक 02111 मुंबई -अमरावती विशेषच्या फेऱ्या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

8) ट्रेन क्रमांक 02112 अमरावती मुंबई विशेषच्या फेऱ्या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

9) ट्रेन क्रमांक 02271 मुंबई -जालना विशेषच्या फेऱ्या दि. 27.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

10) ट्रेन क्रमांक 02272 जालना -मुंबई विशेषच्या फेऱ्या दि. 28.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

Exit mobile version