27.5 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषभिलाईतून ऑक्सिजन, गडकरींची भलाई

भिलाईतून ऑक्सिजन, गडकरींची भलाई

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील कोविडचा हाहाकार सुरू असताना नागपूर, विदर्भातील आणि महाराष्ट्रातील रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अविरत सुरू ठेवले आहे. आता छत्तीसगडच्या भिलाईमधून १४० टन ऑक्सिजनचा पुरवठा नागपूर, विदर्भासाठी करण्यात येणार आहे. या कामातील अडचणी दूर करून ऑक्सिजनची गरज वेळेत पूर्ण व्हावी यासाठी गडकरी झटत आहेत.

नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील यावेळी हजर होते.

हे ही वाचा:

गुरूद्वाराकडून ऑक्सिजन लंगरची सोय

देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र

कोरोना झाला तर ‘या’ कंपनीत २१ दिवसांची पगारी सुट्टी

पुरवठा कमी? मग महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण कसे?

ते म्हणाले की, सध्या ऑक्सिजनच्या वहनासाठी ७ गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्यारे खान यांच्या कंपनीला या ऑक्सिजनचे वहन करण्याचे कंत्राट दिले आहे.

नागपूरला २०० टन ऑक्सिजनची गरज पडते. सध्या भिलाई वरून उपलब्ध झालेला ऑक्सिजन आणण्यात थोडा उशिर होतोय. ऑक्सिजन वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याबरोबरच इथे गाडी आल्यावर लगेच त्यातला ऑक्सिजन काढून घेऊन ती तात्काळ परत पाठवली पाहिजे. कारण वहन वेगाने झाले पाहिजे.

सध्या नागपूरात २०,००० सिलेंडर आहेत. त्यापैकी १०,००० रिकामे असतात आणि उर्वरीत वापरले जातात. त्यांची संख्या वाढवण्याबाबत देखील गडकरींनी माहिती दिली.

या व्यतिरिक्त ११००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एअर इंडियाच्या विनानातून अमेरिकेतून नागपूरात लवकरच मोफत दाखल होणार आहेत त्यांचा देखील फायदा होणार असल्याचे सांगितले. रुग्णाच्या परिस्थितीवर ऑक्सिजनची गरज अवलंबून असते, त्यामुळे रेशन वाटपाप्रमाणे ऑक्सिजनचे वाटप शक्य नाही. सध्या आहे त्या परिस्थितीत मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. रुग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे, असेही ते म्हणाले.

रेमडेसिवीरचे उत्पादन उद्यापासून सुरू होईल. मुळे नागपूरला ३०००० रेमडेसिवीरचा पुरवठा दररोज होईल, जो आम्ही राज्यात इतर ठिकाणीही देऊच. हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी केले जात आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नितीन गडकरी यांनी विविध ठिकाणी ऑक्सिजनच्या सिलेंडरचा पुरवठा केला जात असल्याचेही सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा