भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० सामन्यात रिंकू सिंहने शॉन एबॉनच्या ज्या शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार लगावला, ना तो संघासाठी फायदेशीर ठरला, ना स्वतःला. तो नो बॉल होता. नियमानुसार, भारत सामना जिंकला होता. त्यामुळे तो षटकार गणला गेला नाही.
रिंकू सिंह याने ऑस्ट्रेलियाविरोधात विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी २० सामन्यात चांगला खेळ दाखवला. भारताला पाच षटकांत तब्बल ५० धावा हव्या असताना त्याने कामगिरी उंचावली. विजयाच्या समीप असताना सूर्यकुमार यादव बाद झाला. त्यामुळे विजय मिळवण्याची जबाबदारी रिंकू सिंह याच्यावर आली. तो एका बाजूला किल्ला लढवत असताना त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नव्हती. अखेर भारताला शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. रिंकू सिंह याने शॉन अबॉटच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावून भारताला सामना जिंकून दिला. मात्र हा षटकार वाया गेला.
रिंकू सिंहने ज्या चेंडूवर षटकार लगावला तो नो बॉल होता. नियमानुसार, या नो बॉलमुळेच भारताला विजय मिळाला होता. त्यामुळे रिंकू सिंह याने फटकावलेला षटकार ना त्याच्या खात्यात धावा जोडू शकला ना संघाच्या. रिंकू सिंह १४ चेंडूंमध्ये २२ धावा करून नाबाद राहिला. जर त्यांनी मारलेला षटकार खात्यात जमा झाला असता तर त्यांच्या २८ धावा झाल्या असत्या.
हे ही वाचा:
‘या’ प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर गुन्हा
आठ माजी नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधातील भारताचे अपील कतारने स्वीकारले!
रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती!
“एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर टर्मिनल २ उडवणार” मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल
नाणेफेक हरून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने जोश इंग्लिश (११०) शतकाच्या जोरावर २० षटकांत २०८ धावा केल्या. तर, स्मिथने ५२ धावा केल्या. भारताच्या वतीने रवी बिश्णोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी १-१ विकेट घेतल्या. यशस्वी जयस्वाल याने आठ चेंडूंत २१ धावा करून भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र उपकर्णधार ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन (५८) आणि सूर्यकुमार यादव (८०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. अखेर रिंकू सिंह याने भारताला विजयपथावर नेले.
