सलमानच्या “बॅटल ऑफ गलवान”चे नाव बदलून “मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस”

नवे पोस्टर प्रदर्शित करून निर्मात्यांनी दिली माहिती

सलमानच्या “बॅटल ऑफ गलवान”चे नाव बदलून “मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस”

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचा आगामी चित्रपट “बॅटल ऑफ गलवान” हा चर्चेत आला असून या सिनेमाचे नाव बदलण्यात आले आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे शीर्षक आता “मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस” करण्यात आले आहे. निर्मात्यांनी सोमवार, १६ मार्च रोजी यासंबंधी घोषणा केली. चित्रपटाचे एक नवीन पोस्टर देखील रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये सलमान खानचा एक आक्रमक आणि गंभीर असे रूप दर्शवणारा फोटो आहे.

अपूर्व लाखिया दिग्दर्शित, “बॅटल ऑफ गलवान” हा २०२६ च्या सर्वात चर्चेतील चित्रपटांपैकी एक आहे. अशातच निर्मात्यांनी ‘मातृभूमी’ हे चित्रपटाचे नवीन शीर्षक बनवले असून टॅगलाइन देखील जोडली आहे- “मे वॉर रेस्ट इन पीस”. या चित्रपटातील अनेक गाणी आतापर्यंत प्रदर्शित झाली आहेत. या टीझरला प्रेक्षकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंगची मुख्य भूमिका आहे. सलमान खानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपी आणि मुख्य सचिवांना हटवले

युद्धादरम्यान दिशाभूल करणारी सामग्री शेअर केल्याबद्दल युएईमध्ये १९ भारतीयांना अटक

ट्रम्प यांना दणका; ब्रिटन, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा नौदल पाठवण्यास नकार

पाकिस्तानच नाही तर, ब्रिटन मलेशियामध्येही पोहचवली भारतासंबंधीची माहिती

“बॅटल ऑफ गलवान” चे पहिले गाणे २४ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या अगदी आधी प्रदर्शित झाले होते. अरजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या देशभक्तीपर गाण्याचे शीर्षक “मातृभूमी” आहे. या गाण्याला २१.९४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. सलमान खानच्या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी, म्हणजेच अभिनेत्याच्या वाढदिवसाला प्रदर्शित झाला होता.

Exit mobile version