जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहोचवणारा अटकेत!

काश्मीर पोलिसांची माहिती 

जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहोचवणारा अटकेत!

सुरक्षा दलांनी आज क्रालपोरा येथील चौकीबल येथील मर्सरी गावात संयुक्त कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन (CASO) दरम्यान एका दहशतवाद्याला अटक केली. ही कारवाई ०५ PARA, १६० टेरिटोरियल आर्मी, ९८ बटालियन CRPF, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) क्रालपोरा आणि पोलिस स्टेशन क्रालपोरा यांनी संयुक्तपणे सुरू केली.

या कारवाईदरम्यान, वली मोहम्मद मीर नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला, ज्यामध्ये एक AK-५६ रायफल, तीन AK-५६ मॅगझिन, ११५० राउंड AK-५६ दारूगोळा आणि १७ UBGL ग्रेनेड यांचा समावेश आहे.

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की अटक केलेला व्यक्ती प्रतिबंधित दहशतवादी संघटनांसाठी दहशतवादी सहकारी म्हणून काम करत होता आणि तो प्रदेशातील सक्रिय दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहोचवण्यात सहभागी होता. दहशतवादी वली मोहम्मद मीरला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

हे ही वाचा : 

गुगलने ऑस्ट्रेलियन सरकारला का दिला कारवाईचा इशारा ?

ली जुन-सोक यांच्या घरी विशेष तपास पथकाची छापेमारी

थायलंड आणि कंबोडिया यांच्यात युद्धविराम

थायलंड आणि कंबोडियाची तात्काळ युद्धबंदीवर सहमती!

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याने सर्च ऑपरेशन राबवत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. बातम्यांनुसार, ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये दोन दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील आहेत. अबू हमजा, सुलेमान आणि यासिर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

Exit mobile version