कर्नाटकातील तुरुंगात कैद्यांचे नाचगाणे; तुरुंग अधिकाऱ्याची बदली

कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी दिली माहिती

कर्नाटकातील तुरुंगात कैद्यांचे नाचगाणे; तुरुंग अधिकाऱ्याची बदली

बंगळूरू मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना मोबाईल फोन वापरताना, नाचताना आणि त्यांना एकूणच व्हीआयपी वागणूक देताना दाखवणाऱ्या व्हायरल व्हिडिओंनंतर, आता तुरुंग प्रमुख अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) एक अधिकारी बंगळूरू मध्यवर्ती कारागृहाचे प्रमुख असतील.

व्हायरल व्हिडिओमध्ये आयसिसचा कार्यकर्ता आणि बलात्कार-हत्येचा एक आरोपी तुरुंगाच्या आवारात मोबाईल फोन वापरत आणि टीव्ही पाहत असल्याचे दिसून आले आहे. संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी शनिवारी चौकशी सुरू केली होती. नंतर, परमेश्वर यांनी बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना व्हीआयपी वागणूक दिल्याच्या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, “हे सहन करणार नाही.” रविवारी बेंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातील एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली, ज्यामध्ये कैद्यांना मोबाईल फोन वापरताना, टेलिव्हिजन पाहताना, दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये आयसिस भरती करणारा झुहैब हमीद शकील मन्ना आणि एक बलात्कार- हत्या प्रकरणात तुरुंगात असलेले इतर अनेक कुख्यात गुन्हेगार दिसत होते. काही मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये, बेंगळुरूचा रहिवासी मन्ना चहा पिताना आणि व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीशी बोलत असताना फोनवरून स्क्रोल करताना दिसत होता. मन्ना याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने आयसिसशी संबंध असल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता कारण त्याने त्यासाठी निधी गोळा केला होता आणि सीरियामध्ये आयसिसमध्ये सामील होण्यासाठी काही तरुणांना पाठवले होते.

दुसऱ्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी उमेश रेड्डी तुरुंगात तीन फोन वापरत असल्याचे दिसून आले आहे. तुरुंगाच्या कर्मचाऱ्यांना तुरुंगाच्या आवारात फोन आणि टेलिव्हिजन वापरल्या जात असल्याची माहिती होती. आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये कैदी दारू आणि नाश्त्यासह पार्ट्या आयोजित करताना आणि एकमेकांसोबत नाचताना दिसत होते.

हे ही वाचा:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना डच्चू देत काँग्रेसचा स्वबळाचा नारा!

उत्तर प्रदेशमधील शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य!

गुजरातनंतर फरिदाबादेत ३०० किलो आरडीएक्ससह डॉक्टर सापडला

चीनमध्ये डॉक्टर झालेला कट्टर इस्लामी भारतीयांवर करणार होता विषप्रयोग

यानंतर कर्नाटक सरकारच्या विरोधी पक्ष भाजपने सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बंगळूरू येथील सरकारी निवासस्थानाबाहेर तुरुंगातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या कथित ‘व्हीव्हीआयपी वागणुकी’ विरोधात निदर्शने केली. भाजप जिल्हा प्रभारी एस हरीश यांनी बंगळूरू तुरुंगात कुख्यात गुन्हेगार आणि दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान निर्माण केल्याबद्दल काँग्रेस सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी पक्षाची मागणी आहे आणि सिद्धरामय्या यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version