‘परिस्थिती सारखीच’: कॉंग्रेसच्या उदित राज यांनी नेपाळची तुलना भारताशी केली, भाजपाचे प्रत्युत्तर!

भाजपचे नेते सीआर केशवन यांनी केली टीका 

‘परिस्थिती सारखीच’: कॉंग्रेसच्या उदित राज यांनी नेपाळची तुलना भारताशी केली, भाजपाचे प्रत्युत्तर!

नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीचा संदर्भ देत भारताशी तुलना करणाऱ्या काँग्रेस नेते उदित राज यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी जोरदार टीका केली. भाजपचे नेते सीआर केशवन यांनी उदित राज यांच्या विधानांवर तीव्र आक्षेप घेत, त्यांना “धोकादायक” म्हणत असा आरोप केला की त्यांनी “जाणूनबुजून अशांतता भडकवण्याचा प्रयत्न” केला आहे.

सीआर केशवन यांनी असेही सांगितले की, “श्रीलंका आणि बांगलादेशातील उदाहरणे देत भारतात अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते असे सूचित करणे अतिशय जबाबदारीशून्य आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये अनावश्यक भीती व दहशत निर्माण होऊ शकते.”

एक्सवरील एका पोस्टमध्ये भाजपचे केशवन यांनी लिहिले की, “काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचे हे धोकादायक विधान उघडपणे देशविरोधी आणि जाणूनबुजून अशांतता निर्माण करणारे आहे. भूतकाळातील आणि वर्तमानातील काँग्रेस नेतृत्व नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी सर्वात मोठा धोका आहे. १९७५ मध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या संविधानाची हत्या केली आणि आपल्या लोकशाहीचा नरसंहार केला. हे विधान काँग्रेसच्या त्याच आपत्कालीन मानसिकतेचे प्रतिबिंब आहे.”

हे ही वाचा : 

“अमेरिकेने जे केले तेच आम्ही केले” दोहा हल्ल्यानंतर नेतान्याहू असं का म्हणाले?

भाषण करत असतानाच ट्रम्प यांचे विश्वासू चार्ली कर्क यांच्यावर झाडल्या गोळ्या

वॉन्टेड मुनव्वर खानला सीबीआयने इंटरपोलच्या मदतीने कुवैतहून भारतात आणले!

नेपाळ: तुरुंगातून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांवर लष्कराचा गोळीबार, २ ठार!

उदित राज यांनी एक्सवर पोस्टकरत म्हटले होते, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने जनतेने सरकार उलथवून टाकले आहे, ते भारतात घडू शकत नाही का, यावर लोक चर्चा करत आहेत. काही लोक तर असे होण्याची शक्यताही व्यक्त करत आहेत. खरं तर, परिस्थिती सारखीच आहे आणि काही प्रकरणांमध्ये त्याहूनही अधिक आहे, परंतु आपले संविधान हे होण्यापासून रोखते. आपल्या लोकशाहीची मुळे खूप खोलवर आहेत जी काँग्रेसने रोवली आहेत.

Exit mobile version