चार मुस्लिम मुलांसाठी एनएसएस शिबिरात हिंदू विद्यार्थ्यांवर नमाज पठणाची सक्ती!

७ शिक्षकांवर गुन्हा दाखल

चार मुस्लिम मुलांसाठी एनएसएस शिबिरात हिंदू विद्यार्थ्यांवर नमाज पठणाची सक्ती!

छत्तीगडच्या बिलासपूर जिल्ह्यात एनएसएस कॅम्प दरम्यान गुरु घासीदास सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या काही विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याबद्दल शनिवारी (२६ एप्रिल) सात शिक्षकांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

कोटा पोलिस स्टेशन हद्दीतील शिवतराई गावात २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान झालेल्या शिबिरात १५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १५९ विद्यार्थ्यांपैकी केवळ चार मुले मुस्लीम समाजाची होती, मात्र विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. यासह उजव्या विचारसरणीच्या संघटनांनीही जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : 

युवकांनी भारताबद्दल जगाचा दृष्टिकोन बदलून टाकला

पहलगाम हल्ला : अभिनेता अर्जुन बिजलानीने काय घेतला निर्णय?

भारतीय नौसेना सज्ज

पहलगाम हल्ला: आतापर्यंत ९ दहशतवाद्यांची घरे उध्वस्त!

पोलिसांनी सांगितले की, “ही घटना ३१ मार्च रोजी घडली. बिलासपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रजनीश सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहर पोलिस अधीक्षक (कोतवाली) अक्षय साबद्रा यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. तपास अहवाल एसएसपींना सादर केल्यानंतर शनिवारी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.”

दिलीप झा, मधुलिका सिंग, ज्योती वर्मा, नीरज कुमारी, प्रशांत वैष्णव, सूर्यभान सिंग आणि बसंत कुमार, या शिक्षकांसह टीम कोर लीडर-सह-विद्यार्थी आयुष्मान चौधरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १९६ (ब), १९७ (१९७ ), १९७ (बी), १९७ (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएसचे ३०२ , १९० आणि छत्तीसगड धार्मिक स्वातंत्र्य कायद्याचे कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version