कुलगाम चकमक: दोन दहशतवादी ठार, दोन जवान जखमी!

दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता

कुलगाम चकमक: दोन दहशतवादी ठार, दोन जवान जखमी!

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर वनक्षेत्रात सोमवारी (८ सप्टेंबर) झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर दोन लष्करी जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी विशिष्ट गुप्त माहिती दिल्यानंतर ही कारवाई सुरू झाली, त्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफने संयुक्त शोध मोहीम सुरू केली. 

“सतर्क जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यांना आव्हान देण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामुळे जोरदार गोळीबार झाला ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे आणि एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी जखमी झाला आहे. ऑपरेशन प्रगतीपथावर आहे,” अशी भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्सवर माहिती दिली.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे आणि चकमक सुरू आहे.

हे ही वाचा : 

शशी थरूर म्हणतात, भारत झुकेगा नही!

कर्नाटक: गणेश विसर्जनादरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांचा गोंधळ, २१ जणांना अटक!

डोके ठिकाणावर आल्याचे संकेत ?

युवकांना रोजगाराशी जोडण्यासाठी मिशन मोडमध्ये योगी सरकार

यानंतर चिनार कॉर्प्सने आणखी एक पोस्ट केली आणि माहिती दिली की, कुलगामच्या गुड्डर जंगलात सुरू असलेल्या कारवाईत आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. एक सैनिक जखमी झाला असून त्याला आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर काढण्यात आले आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. 

दरम्यान, स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षा दलांकडून या कारवाईला दहशतवादविरोधी मोहिमेतील मोठे यश मानले जात आहे.

Exit mobile version