सिंदूर पुसणाऱ्यांचा नाश निश्चित!

पंतप्रधान मोदींचे दाहोदमध्ये प्रतिपादन

सिंदूर पुसणाऱ्यांचा नाश निश्चित!

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि इतर सरकारी प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यावेळी त्यांनी गुजरातमधील दाहोदला भेट दिली आणि लोको मॅन्युफॅक्चरिंग शॉप-रोलिंग स्टॉक वर्कशॉपचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर त्यांनी दाहोदमधील खारोड येथे जनतेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सभेत ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. ते म्हणाले, सिंदूर पुसणाऱ्यांचा नाश निश्चित आहे.

ते म्हणाले, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे केले त्यावर भारत कसा शांत बसेल, मोदी कसा शांत बसेल?. जेव्हा कोणी आपल्या बहिणींचे सिंदूर पुसतो, तेव्हा त्याचाही नाश निश्चित असतो. दहशत पसरवणाऱ्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल कि मोदींशी स्पर्धा करणे किती कठीण होईल ते.

लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली, आजही ते चित्र समोर आले कि रक्त उसळून येते. दहशतवाद्यांनी १४० कोटी भारतीयांना आव्हान दिले होते. देशवासीयांनी मला प्रधान सेवकाची जबाबदारी दिली होती आणि त्याच प्रमाणे मोदीने कारवाई केली.

ते पुढे म्हणाले, मोदीने आपल्या तीनही सेनेला सूट दिली. त्यानंतर आमच्या शूरवीरांनी जे करून दाखवले ते जगाने अनेक दशकांपासून पाहिले नव्हते. आमच्या शूर सैनिकांनी सीमेपलीकडे कार्यरत असलेले ९ दहशतवादी अड्डे शोधून काढले आणि २२ तारखेला जो त्यांनी खेळ खेळला होता, ते ६ तारखेच्या रात्री आम्ही २२ मिनिटांत उद्ध्वस्त केले.

हे ही वाचा : 

मोदींच्या नेतृत्वात आरोग्यविषयक सुविधांचा विकास

हिंदमाताच्या तुमच्या निकृष्ट कामाची पोलखोल यापूर्वीच झालीये, मुंबईकरांना मुर्खात काढू नका!

नवव्या जागतिक ड्रोन परिषदेत बघा काय घडलं!

गद्दार ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर हा त्यांचा पहिलाच राज्य दौरा आहे. सोमवारी सकाळी ते प्रथम वडोदरा येथे पोहोचले आणि त्यांनी रोड शो केला. यानंतर मोदी दाहोदला पोहोचले आणि येथेही रोड शो केला. वडोदरा येथे पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला होता.

Exit mobile version