“स्वतः जामिनावर असलेले पंतप्रधानांवर आरोप करतायेत”

शाहनवाज हुसैन यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

“स्वतः जामिनावर असलेले पंतप्रधानांवर आरोप करतायेत”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचारातील वक्तव्यांवर भाजप नेते आणि माजी मंत्री सैयद शाहनवाज हुसैन यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी गुजरात मॉडेलला “मतचोरीचं मॉडेल” म्हटल्याने हुसैन यांनी त्यांच्यावर राष्ट्रविरोधी वक्तव्यांचा आरोप केला आणि ते देशाचा, गुजरातचा व जनतेचा अपमान करत असल्याचे सांगितले.

काय म्हणाले शाहनवाज हुसैन?

“राहुल गांधी गुजरातच्या प्रगतीचा अपलाप (व्यर्थ बोलणे) करत आहेत. गुजरात हे विकासाचं प्रतीक आहे. तिथे प्रतिव्यक्ती उत्पन्न उच्च आहे, पायाभूत सुविधा उत्तम आहेत. जेथे जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिलं, तिथे राहुल गांधी त्याच गुजरात मॉडेलला मतचोरीचं मॉडेल म्हणत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे.”

“राहुल गांधींनी त्यांच्या भाषेत चोरी हा शब्द स्वीकारला आहे. स्वतः जे अनेक भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये जामिनावर आहेत, तेच आता पंतप्रधानांवर आरोप करत आहेत. हे हास्यास्पद आहे.”

“बिहारमध्ये त्यांच्या यात्रेचा जनतेने साफ नकार दिला आहे. त्यांनी जे नेते बोलावले – रेवंत रेड्डी, स्टॅलिन – त्यांनी पूर्वी बिहारचा अपमान केला आहे. त्यांनी अशा नेत्यांना बोलावून बिहारच्या जनतेला चिथावण्याचा प्रयत्न केला, पण यातून काहीच साध्य होणार नाही.” “बिहारमध्ये एनडीए मजबूत आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयही एनडीएचाच होईल.” 

हे ही वाचा : 

केरळमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना ओणम साजरा न करण्याचा सल्ला!

बरेलीमध्ये छांगूर बाबा सारख्या धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

राहुल गांधींच्या ‘वोटचोरी’ आंदोलनात पाकीट चोरी !

गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन

दरम्यान, राहुल गांधी सध्या बिहारमध्ये ‘वोटर अधिकार यात्रा’च्या माध्यमातून प्रचार दौऱ्यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी भाजपच्या गुजरात मॉडेलवर टीका करताना त्याला “मतचोरीचं मॉडेल” असे संबोधले होते. यावरून भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

Exit mobile version