“स्विंगचा सम्राट ट्रेंट बोल्ट – वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवणारा न्यूझीलंडचा वेगवान वादळ!”

“स्विंगचा सम्राट ट्रेंट बोल्ट – वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवणारा न्यूझीलंडचा वेगवान वादळ!”

बोल्ट… ट्रेंट बोल्ट! नाव घेताच समोर उभा राहतो एक असा खेळाडू, ज्याचं बॉल हातातून निघाल्यावर दिशा ओळखणं अवघड होतं – आणि बॅट्समनला फक्त विकेट ऐकू येते. ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंडचा डावखुरा स्विंग गोलंदाज, ज्याने वेग, स्विंग आणि संयम यांची अचूक त्रिसूत्री साधत क्रिकेट जगतात आपली अमिट छाप सोडली.

२२ जुलै १९८९ रोजी रोटोरुआमध्ये जन्मलेला बोल्ट अवघ्या १७व्या वर्षी न्यूझीलंडमधील सर्वात वेगवान स्कूल क्रिकेटर ठरला. पुढच्या वर्षीच तो अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी निवडला गेला. पण २००९ मध्ये पीठाच्या दुखापतीमुळे दोन वर्ष क्रिकेटपासून दूर राहावं लागलं.

पण याच काळात त्याने स्वतःवर काम केलं – स्ट्रेंथ आणि फिटनेसवर फोकस करत २०११ मध्ये न्यूझीलंडच्या सीनियर संघात पदार्पण केलं. २०१२ मध्ये वनडे आणि २०१३ मध्ये टी२० क्रिकेटमध्येही आपल्या करिअरला सुरुवात केली.

त्याच्या १४० किमी/तासहून अधिक वेगासह येणाऱ्या स्विंगनं जगभरातील फलंदाजांना हादरवलं. रेड आणि व्हाइट बॉल, दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने स्वतःचा ठसा उमटवला.

२०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये ट्रेंट बोल्टने ९ सामन्यांत २२ बळी घेतले आणि मिचेल स्टार्कसोबत टॉप विकेट टेकर ठरला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ २७ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडने हा सामना एक विकेटने जिंकला.

इतकंच नाही तर बोल्ट हा वर्ल्ड कपमध्ये ५० विकेट्स घेणारा पहिला न्यूझीलंड गोलंदाज बनला – हा विक्रम लवकर मोडला जाणं कठीणच!

हेही वाचा:

सिरीज कोणाच्या नावावर? आज रंगणार भारत-इंग्लंड महिला महासंग्राम!

केरळमध्ये अडकलेले F-३५ विमान झाले दुरुस्त, आज होणार उड्डाण चाचणी!

बांगलादेश हवाई दलाचे विमान ढाक्यातील शाळेवर कोसळले, एकाचा मृत्यू!

सोमय्या म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक!

२०२४ टी२० वर्ल्ड कपनंतर ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
त्याच्या करिअरकडे पाहिलं, तर –

आयपीएल प्रवासही काही कमी नव्हता –

आयपीएलमध्ये एकूण १२० सामने खेळून १४३ विकेट्स घेणारा बोल्ट आजही फ्रँचायझी लीग्सचा सुपरस्टार आहे.

Exit mobile version